दिनविशेष २१ डिसेंबर
दिनविशेष
दि. २१ डिसेंबर
◆ जन्म
१. (१९०३) प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे यांचा जन्म
ते मराठी उद्योजक होते. गरवारे उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते. आबासाहेबांनी आपल्या स्वबळावर उद्योग विकसित केला. भारतामध्ये थर्मोप्लास्टिक उद्योगाची मुहूर्तमेढ रोवून नायलॉन आणि सिंथेटिक फायबरच्या क्षेत्रात त्यांनी यशस्वीरीत्या प्रवेश केला. स्वातंत्र्योत्तर काळातील हाउस ऑफ गरवारेने केलेली अभूतपूर्व प्रगती भारताच्या औद्योगिक प्रगतीच्या इतिहासामध्ये अंतर्निहित आहे आणि अल्पावधीतच ते प्लास्टिक उद्योगाचे जनक झाले
२. (१९३२) भारतीय साहित्यकार, पत्रकार, आणि समीक्षक यु. आर. अनंतमुर्ती यांचा जन्म
३. (१९३२) आकाशवाणी वरील जेष्ठ आणि प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचा जन्म
अमीन सयानी हे भारतातील लोकप्रिय माजी रेडिओजॉकी आणि रेडिओ उद्घोषक आहेत. रेडिओ सिलोन वर त्या त्या आठवड्यात प्रसिद्धी मिळवणाऱ्या चित्रपट गीतांची मालिका बिनाका गीतमाला कार्यक्रम सादर करत असत. या कार्यक्रमात ने त्यांना संपूर्ण भारतीय उपखंडात प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली
आजही ते सर्वात जास्त अनुकरण केल्या जाणाऱ्या उद्घोषकांपैकी एक आहेत. पारंपारिक 'भाइयों और बहनो' च्या विरूद्ध 'बेहनो और भाइयों' (म्हणजे 'बहिणी आणि भावांनो') ने जमावाला संबोधित करण्याची त्यांची शैली त्याकाळात मोठी प्रसिद्धीस आली होती. त्यांनी १९५१ पासून ५४,००० हून अधिक रेडिओ कार्यक्रम आणि १९,००० स्पॉट्स/जिंगल्सची निर्मिती केली आहे
४. (१९६६) बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांचा जन्म
५. जेष्ठ पत्रकार संजय आवटे यांचा जन्म
● निधन
१. (१९७९) चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक यांचे निधन
ते मराठी प्राध्यापक, प्रकांड पंडित, पत्रकार, चरित्रलेखक, इतिहाससंशोधक, मराठी संत वाङ्मयाचे चिकित्सक व साहित्य समीक्षक होते. न. र. फाटक हे १९३७ साली विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. हैदराबाद येथे १९४७ साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते
फाटक स्वतंत्र प्रज्ञेचे समीक्षक होते तसेच प्रचलित विचारप्रवाहाविरुद्ध मतप्रदर्शन करून वाद निर्माण करणे हे त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनाचे वैशिष्ट्य होते. मराठी पत्रकार संघाचे ते पहिले अध्यक्ष होते. भारत इतिहास संशोधन मंडळ, प्राज्ञ पाठशाला मंडळ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई मराठी साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अशा विविध संस्थांचे ते सदस्य वा पदाधिकारी होते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment