दिनविशेष १७ डिसेंबर

दिनविशेष 

दि. १७ डिसेंबर

■ दिनविशेष

१. राष्ट्रीय निवृत्तिवेतनधारक दिवस

राष्ट्रीय निवृत्तिवेतनधारक दिवस दरवर्षी 17 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस निवृत्तिवेतनधारकांच्या कष्टांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी समर्पित आहे. निवृत्तिवेतन ही निवृत्त व्यक्तींच्या आर्थिक स्थैर्याची हमी आहे, ज्यामुळे त्यांना निवृत्तीनंतरही सन्मानाने जीवन जगता येते

सरकारने निवृत्तिवेतन योजना राबवून अनेक कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित केली आहे. हा दिवस निवृत्त व्यक्तींनी दिलेल्या सेवांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपाययोजना करण्याची संधी प्रदान करतो

निवृत्तिवेतनधारकांसाठी सवलती, आरोग्य सेवा, आणि सामाजिक लाभांच्या योजनांचे महत्त्व वाढले आहे. त्यांचे अनुभव आणि ज्ञान हे समाजासाठी मोठा ठेवा आहेत, ज्याचा उपयोग नवीन पिढ्यांना मार्गदर्शनासाठी होतो

राष्ट्रीय निवृत्तिवेतनधारक दिवस आपल्याला त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि त्यांच्या सुखकर निवृत्तीचे महत्त्व समजण्याची प्रेरणा देतो. त्यांचा आदर आणि कल्याण हे आपले कर्तव्य आहे

◆ जन्म 

१. (१९११) विलक्षण अनुभव बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रणाच्या अत्यंत दुर्मिळ हातोटीमुळे अनेक नामवंतांकडून सन्मानित झालेले चित्रकार व लेखक दत्तात्रय धोंडो उर्फ डी. डी. रेगे यांचा जन्म

लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत

२. (१९४१) अभिनेते विजू खोटे यांचा जन्म

ते मराठी व हिंदी चित्रपटांतून काम करणारे अभिनेते होते. त्यांनी ४४० पेक्षा अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांतून कामे केली

● निधन

१. (१९८५) नाटककार, कथाकार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचे निधन

ते साहित्यातील आणि चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज नाव. ते मराठी नाटककार, कथाकार आणि कवी म्हणून प्रसिद्ध झालेच पण त्याचबरोबर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत ते गीतकार आणि पटकथाकार म्हणूनही प्रथितयश झाले. कालेलकरांनी एकूण २९ नाटके आणि मराठी व हिंदी मिळून १११ चित्रपटांसाठी लिखाण केले. त्यात त्यांनी कौटुंबिक, गंभीर, विनोदी, सामाजिक असे अनेक विषय हाताळले आहेत

२. शिक्षणतज्ज्ञ, समाजवादी विचारवंत, पुणे विद्यापीठाचे दहावे कुलगुरू देवदत्त अच्युत दाभोळकर यांचे निधन

३. (२०१९) मराठी व हिंदी नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील अभिनेते व दिग्दर्शक श्रीराम लागू यांचे निधन

१९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर सिंहासन, पिंजरा, मुक्ता सारख्या अनेक चित्रपटांतून कामही केले

ते महाराष्ट्रातील अंधविश्वास निर्मूलन समितीशी जोडलेले होते. देव हा सुद्धा एक अंधविश्वासासाच प्रकार आहे असे त्यांचे म्हणणे होते. ते विज्ञानवादी आणि समाजवादी आहेत. सुशिक्षित लोकसुद्धा नवस वगैरे करतात हे पाहून त्यांना वाईट वाटे. आपल्या जीवनाचे आपण शिल्पकार असतो आणि आपले ध्येय साध्य करायचे आपल्याच हातात असते, असा विचार तरुण पिढीला डॉ. लागू नेहमी देत असतात. आपल्या देशातील अंधश्रद्धा गरिबीमुळे आणि अज्ञानामुळे लवकर नाहीशी होणार नाही याची त्यांना चिंता वाटे. बुवाबाजीमुळे परमेश्वराचे बाजारीकरण झालेले आहे हे त्यांना स्पष्ट दिसत होते. देवाच्या नावाने व्यापार करणारे धूर्त लोक हे समाजचे शत्रू आहेत हे ते स्पष्टपणे सांगत. देवाला रिटायर करा असे म्हणत त्यांनी पुरोगामी आणि आणि तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला होता

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर