दिनविशेष ०८ नोव्हेंबर
दिनविशेष
दि. ०८ नोव्हेंबर
★ घटना
१. (२०१६) भारतात ५०० व १००० रूपयांच्या नोटांची नोटाबंदी करण्यात आली
नोटाबंदीने जे साध्य करायचे होते ते तर झालं नाही. मात्र भारताची अर्थव्यवस्था त्यामुळे रसातळाला गेली. नोटाबंदी हे भारतीय अर्थव्यवस्थेतील मोठे अपयश आहे
◆ जन्म
१. (१९०९) स्वातंत्र्यसैनिक, निर्भिड पत्रकार व काँग्रेसचे तत्त्वनिष्ठ नेते नरहर वामन तथा नरुभाऊ लिमये यांचा जन्म
स्वातंत्रसेनानी, जेष्ठ पत्रकार अशी ओळख मिळवलेले, नरहर वामन उर्फ नरुभाऊ लिमये. सोबतच राजकारणी आणि कॉंग्रेसी नेता अशी देखील त्यांची ओळख. मूळचे साताऱ्याचे आणि स्वातंत्र्यचळवळीतले यशवंतराव चव्हाण यांचे अत्यंत जवळचे सहकारी. नरुभाऊ १९६२ पासून सभागृहात होते. सरकार दरबारी त्यांचे वजन आहे हे माहीत असलेला कोणी ना कोणी आपले गाऱ्हाणे घेऊन त्यांच्याकडे आला की नरुभाऊंमधला सार्वजनिक कार्यकर्ता जागा व्हायचा. भेटावयास आलेल्या माणसाला सांगतात, मी उद्या मुंबईला जाणार आहे. संबंधीत अधिकाऱ्याची गाठ घेऊन तो काय म्हणतो ते मी पाहतो. परवा सकाळी भेटायला या अशा एका दिवसात त्यांनी शक्य तितक्या जणांची गाऱ्हाणी मार्गी लावली. आमदार झाल्यावर देखील त्यांनी त्यांच्यातील पत्रकार कायम जागा ठेवला. त्यामुळे ते नेहमी म्हणत असत, आज मी आमदार आहे; पण हे पद केव्हा जाईल ते मला माहीत नाही. मी पत्रकार मात्र कायमचा आहे
२. (१९१७) कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे यांचा जन्म
देशातील कर्करोग संशोधनाची सुरुवात करण्याचे श्रेय डॉ. व्ही. आर. खानोलकर व डॉ. कमल रणदिवे यांना दिले जाते
३. (१९१९) आपल्या अलौकिक प्रतिभेने मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारे लेखक पु. ल. देशपांडे यांचा जन्म
पु. ल. देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले
ते एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते. ते एक प्रसिद्ध अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार आणि गायकही होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून ते नेहमी पु. ल. म्हणून ओळखले जातात
४. (१९७६) शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ, शिवसेना उपनेत्या डॉ. प्रा. सुषमा ताई अंधारे यांचा जन्म
● निधन
१. महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन
ते प्रामाणिक, शिस्तप्रिय, स्पष्टवक्ते आणि पोलीस दलात सुधारणांचा आग्रह धरणारे अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. तसेच ते लेखक आणि प्रभावी वक्ते म्हणूनसुद्धा प्रसिद्ध होते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment