दिनविशेष ३० नोव्हेंबर
दिनविशेष
दि. ३० नोव्हेंबर
◆ जन्म
१. (१८३५) विख्यात अमेरिकन कादंबरीकार आणि विनोदकार मार्क ट्वेन यांचा जन्म
The Adventures of Tom Sawyer हे मार्क ट्वेनचे मुलांसाठी लिहिलेले प्रसिद्ध पुस्तक. या पुस्तकाचे 'टाॅम सायरची साहसं' या नावाचे मराठी भाषांतर अवधूत डोंगरे यांनी केले आहे
The Adventures of Huckleberry Finn हे मार्क ट्वेनचे मुलांसाठी लिहिलेले दुसरे प्रसिद्ध पुस्तक. या पुस्तकाचे 'हकलबरी फिनची साहसं' या नावाचे मराठी भाषांतरही अवधूत डोंगरे यांनी केले आहे
२. (१९१०) सौंदर्यप्रेमी रसिक कवी, कविवर्य बा. भ. बोरकर यांचा जन्म
हे मराठी आणि कोंकणी भाषांत कविता करणारे कवी होते. ते मराठी साहित्यप्रेमीही होते. बा.भ. बोरकर हे गोमंतकाचे भूषण होते
निसर्ग आणि स्त्री-सौंदर्य यासंबंधीच्या विविध अनुभवांचा प्रत्ययकारी आविष्कार त्यांच्या काव्यातून घडतो. ‘प्रतिभा’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत. निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न आहे. 'फुलत्या लाख कळ्या', 'सरीवर सरी आल्या गं' या त्यांच्या प्रेमकविता आजही रसिकांच्या ओठांवर आहेत
काव्यलेखनाबरोबर बोरकरांनी ललित लेख, कादंबरी, कथा, चरित्रात्मक प्रबंध यावरही लेखन केले. स्टीफन झ्वाईगच्या कादंबऱ्याचे तसेच महात्मा गांधीजींच्या काही पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले आहेत. त्यांच्या सासाय या संग्रहाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले
मराठी साहित्य विश्वात आनंदयात्री कवी अशी बोरकरांची ओळख होती. बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत. निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न आहे
३. (१९३५) 'झोंबी'कार, लेखक आनंद यादव यांचा जन्म
काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. यादव हे मराठीतील महत्त्वाचे ग्रामीण कांदबरीकार होते. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले
'झोंबी' सारख्या कादंबरीतून ग्रामीण समाज जीवनाचे यथार्थ चित्र त्यांनी रेखाटले. त्यांच्या 'नटरंग' या पुस्तकावर आधारलेल्या नटरंग सिनेमाने प्रेक्षकांची लोकप्रियतेता मिळवली
● निधन
१. (२०२२) मराठी भाषेतील लेखक, कवी, व समीक्षक नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन
ते मराठी भाषेतील लेखक, कवी, व समीक्षक होते. राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष होते. ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते
नागनाथ कोतापल्ले हे इ.स. १९७७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख बनले. २००५ पासून २०१०पर्यंत कोतापल्ले मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment