दिनविशेष २९ नोव्हेंबर
दिनविशेष
दि. २९ नोव्हेंबर
◆ जन्म
१. (१८६९) आदिवासी लोकांच्या उन्नतीसाठी काम करणारे समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ’ठक्कर बाप्पा’ यांचा जन्म
१९५० साली देशभर हिंडून त्यांनी सर्व आदिवासी लोकांची माहिती गोळा केली. तिच्या आधारेच आदिवासींचे कल्याणविषयक कायदे पुढे तयार करण्यात आले. त्यांनी ‘आदिवासी सेवा मंडळा’ची स्थापना केली. त्यांची राहणी अतिशय साधी होती प्रसिद्धीपासून अलिप्त राहून त्यांनी गिरीजन व हरिजन यांची आमरण सेवा केली
२. (१९२६) लेखक, पत्रकार व कामगार संघटनेचे कार्यकर्ते प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म
ते मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते होते
● निधन
१. (१९३९) कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ ’माधव जूलियन’ यांचे निधन
ते मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते. ते फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी. लिट पदवीचे मानकरी आहेत
२. (१९९३) उद्योगपती व वैमानिक, भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक जहांगीर रतनजी दादाभॉय तथा जे. आर. डी. टाटा यांचे निधन
३. (२००७) मराठी भाषेतील कवी, नाटककार आणि समीक्षक केशव मेश्राम यांचे निधन
दलित कवितेच्या प्रारंभ काळातील एक प्रमुख कवी म्हणून त्यांचा उल्लेख होतो. सर्व प्रकारच्या अनुभवांना मोकळेपणाने सामोरी जाणारी त्यांची कविता असून पारंपरिक लयीतील, तसेच मुक्तछंदात्मक लयीतील काव्यलेखनातून त्यांचे काव्यमूल्य सिद्ध होते. समाजातील दैन्य, दारिद्र्य, विषमता व जीवनाच्या सर्वच क्षेत्रांतील अनास्था भाव हे त्यांच्या काव्यलेखनाचे विषय होत. नव्या पिढीच्या ध्येयशून्य तडजोडीची वेदनाही त्यांच्या काव्यात उमटलेली दिसते. म्हणूनच ‘निसर्गाच्या विविध कळा - त्यांतल्या सर्व तरल छटांसह रंगवणार्या मेश्रामांच्या लेखनात शहरी जीवनातील रूक्ष व कडवट अनुभव तीव्रपणे चित्रित झालेले आहेत,’ असे शांता शेळके यांना वाटते
वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतून लेखन करणार्या मेश्रामांचा मूळ पिंड कवीचा होता. ‘कविता’ हा त्यांचा विशेष आवडीचा साहित्यप्रकार. ‘रहस्यरंजन’ विशेषांकात त्यांची ‘मेळा’ ही पहिली कविता प्रसिद्ध झाली (१९५८). त्यानंतर त्यांनी सातत्याने काव्यलेखन केले. ‘उत्खनन’ (१९७७), ‘जुगलबंदी’ (१९८२), ‘अकस्मात’ (१९८४), ‘चरित’ (१९८९), ‘कृतकपुत्र’ (२००१), ‘अनिवास’ (२००५) हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले
४. (२०११) आसामी साहित्यिक आणि लेखिका इंदिरा गोस्वामी यांचे निधन
त्या आसामी लेखिका, कवयित्री व संपादिका होत्या. आसामी साहित्यातील त्यांचे योगदान साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८३) व ज्ञानपीठ पुरस्कार (इ.स. २०००) देऊन गौरवण्यात आले. साहित्य वर्तळात या मामुनी रायसोम गोस्वामी या नावाने ओळखल्या जात. 'युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम' (उल्फा) आणि केंद्र सरकारदरम्यान शांतता-करार करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment