दिनविशेष २८ नोव्हेंबर

दिनविशेष 

दि. २८ नोव्हेंबर

◆ जन्म 

१. (१८७४) गायक आणि अभिनेते रामकृष्ण बुवा वझे यांचा जन्म

ते ग्वाल्हेर घराण्याचे ख्यातकीर्त गायक आणि मराठी संगीत नाटकांचे संगीतकार होते. वझे बुवांची धृपद, खयाल, ठुमरी आदि गायनप्रकारांवर हुकमत होती

२. (१९४४) लेखक मधू पोतदार यांचा जन्म

ते एक मराठी लेखक आहेत. त्यांनी अनेक मराठी संगीत दिग्दर्शकांची चरित्रे लिहिली आहेत

● निधन 

१. (१८९०) थोर समाजसुधारक, क्रांतीसूर्य जोतीराव गोविंदराव फुले तथा महात्मा फुले यांचे निधन

ते महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले. महात्मा फुले नावाने ते ओळखले जात

महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. जोतिरावांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी किंवा भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. खालच्या जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. त्यांना १८८८ मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय 'महात्मा' पदवी प्रदान केली होती

महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे महाराष्ट्र राज्यास 'फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र' असे म्हणतात

२. (१९६३) इतिहासकार आणि लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचे निधन

ते मराठी इतिहाससंशोधक, लेखक व संपादक होते. शिवकाल, पेशवेकाल ह्या काळातील इतिहासाविषयी त्यांनी चिकित्सक लेखन केले आहे. निजाम-पेशवे संबंध, पानिपत : १७६१, श्रीशिवछत्रपती इ. त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. इतिहासाप्रमाणेच समाजशास्त्र हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होता. इतिहास आणि समाजजीवन ह्यांविषयीचे त्यांचे समीक्षणात्मक लेखन प्रगती साप्ताहिकातून प्रकाशित झाले होते. ते या साप्ताहिकाचे संपादक होते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर