दिनविशेष २३ नोव्हेंबर

दिनविशेष 

दि. २३ नोव्हेंबर

◆ जन्म 

१. (१८९७) साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली - इंग्रजी लेखक निराद सी. चौधरी यांचा जन्म

त्यांनी बंगालीमध्ये भारतीय इतिहास आणि संस्कृतीबद्दल लेखन केले. त्यात बंगालमधील ब्रिटिश राजवटीचे अनेक उल्लेख आहेत. त्यांचे ऑटोबायोग्राफी 'ऑफ ॲन अननोन इंडियन' हे सगळ्यात जास्त प्रसिद्ध झाले. त्यांच्या 'द कॉंटिनेंट ऑफ सर्क' या कादंबरीला डफ कूपर मेमोरियल अवॉर्ड दे्यात आला होता. चौधरी यांनी लिहिलेल्या 'स्कॉलर एक्सट्राऑर्डिनरी' या मॅक्स म्युलरच्या चरित्रास साहित्य अकादमी पुरस्कार दिला गेला

२. (१९२३) लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार यांचा जन्म

ना. सं. इनामदार हे मराठीतील ऐतिहासिक कादंबरीकार होते. इतिहासकाळातील उपेक्षित पात्रांना न्याय देणार लेखक अशी त्यांची ओळख मराठी वाचकांमध्ये कायम राहिलं. कादंबरीमधे काय सांगितले आहे, त्याच्याएवढेच महत्त्व ते कसे सांगितले आहे, या गोष्टीला असते. इतिहासाचा विपर्यास होऊ नये यासाठी कसून संशोधन, इतिहासाचे सजर्नशील आकलन, आणि प्रसंगातील नाटयमयता व चित्रदर्शी शैली, यामुळे ते लोकप्रिय कादंबरीकार ठरले. त्यांच्या ऐतिहासिक कादंबरी लेखनाला महाराष्ट्रात तोड नाही

१८५७ च्या स्वातंत्र्यसमरावर लिहीलेली 'बंड' ही त्यांची पहिली कादंबरी, परंतु ती प्रसिध्द होण्यास मात्र १९९६ साल उजाडले. त्या समराच्या शताब्दीच्या निमित्ताने त्यानी ती लिहीली होती. झेप ही त्यांची प्रथम प्रसिध्द झालेली, दुसरी ऐतिहासिक कादंबरी, १९६३ सालामधे प्रकाशित झाली. ज्या काळात वाढते औद्योगिकीकरण, दाबले गेलेले कामगार, बदलणारे सामाजिक आणि व्यक्तिगत वास्तव यांचे पडसाद मराठी साहित्यसृष्टित उमटत होते, त्या काळात आपली आगळी वेगळी शैली घेऊन ना. सं. इनामदार आले आणि त्यांनी मराठी वाचकांना अक्षरश: जिंकून घेतले. इतिहास पुन्हा पुन्हा तपासण्याची 'शिकस्त' केली. त्यांची ही 'झेप' मराठी वाड्मय जगताला एका नव्या क्षितिजाकडे नेणारी ठरली

● निधन

१. (१९५९) अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन

१९०७ मध्ये तुकाराम या नाटकात मंबाजी ही भूमिका साकारून त्यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. पुण्यप्रभाव, राजसन्यास, भावबंधन ही त्यांची नाटके गाजली. मराठी बरोबरच हिंदी व उर्दू नाटकांतूनही त्यांनी भूमिका केल्या

२. (१९८३) शिक्षणतज्ञ गणेश विनायक आकोलकर यांचे निधन

ते एक मराठी शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणविषयक लेखन करणारे मराठी लेखक होते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर