दिनविशेष १९ नोव्हेंबर

दिनविशेष

दि. १९ नोव्हेंबर

■ दिनविशेष 

१. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन

दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी समाज आणि कुटुंबातील पुरुषांचे महत्त्व आणि योगदान अधोरेखित करण्यासाठी जागतिक पुरूष दिन साजरा केला जातो. हाच दिवस आहे जेव्हा समाजात पुरुषांच्या कल्याणासाठी आणि आरोग्याबाबत जागरुकता निर्माण केली जाते. पुरुषांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणे आणि त्यांच्याविरुद्ध होणार्‍या भेदभावाबद्दल जागरुकता निर्माण करणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा सहा स्तंभांवर आधारित आहे, जे समाजातील पुरुषांची सकारात्मक प्रतिमा प्रतिबिंसमाजबित करतात. हा दिवस समाज, समुदाय, कुटुंब, विवाह, मुलांची काळजी आणि पर्यावरणात पुरुषांचे योगदान साजरे करण्यावर भर देतो. या दिवशी समाजात पुरुषांविरुद्ध होत असलेल्या भेदभावावरही प्रकाश टाकला जातो. पुरुष दिन देखील लैंगिक समानतेला प्रोत्साहन देतो

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा १९ नोव्हेंबर रोजी साजरा होणारा वार्षिक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे. याची सुरुवात ७ फेब्रुवारी १९९२ रोजी थॉमस ऑस्टर यांनी केली होती. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या प्रकल्पाची कल्पना एक वर्षापूर्वी ८ फेब्रुवारी १९९१ रोजी करण्यात आली होती. यानंतर १९९९ मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आला

भारतात पहिल्यांदा २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला. भारतात ८ मार्च १९२३ पासून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. त्यानंतर भविष्यात कधी पुरुष दिनाची आवश्यकता भासेल असे कोणाला वाटलेही नसेल. परंतु, हळूहळू लैंगिक समानतेला चालना देण्यासाठी हा दिवसही साजरा होऊ लागला 

पुरुषांच्या आरोग्याप्रति, लिंग संबंधाविषयी जागरुकता, लैंगिक समानतेचा विकास करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. जगात महिलांपेक्षा तीन पट जास्त पुरुष आत्महत्या करतात. ३ पैकी एक पुरुष घरगुती हिंसाचाराचा बळी आहे. पुरुष स्त्रियांपेक्षा ४ ते ५ वर्ष आधी मरण पावतात. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता दुप्पट असते. पुरुष दिन हा पुरुषांच्या ओळखीच्या सकारात्मक पैलूंवर काम करतो. त्यामुळे या सर्व गोष्टींबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा केला जातो. कुटुंब, समाज, समुदाय, समाज व्यवस्था या सर्वामध्ये पुरुषांच्या योगदानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आजच्या दिवशी प्रयत्न केला जातो

२. जागतिक शौचालय दिन (World Toilet Day)

संयुक्त राष्ट्रसंघातर्फे '१९ नोव्हेंबर' हा दिवस 'जागतिक शौचालय दिन' म्हणून जाहीर केला आहे. हा दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे शौचालयाची योग्यपद्धतीने स्वच्छता करण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे हा आहे

आजही कित्‍येक लोक सोयीसुविधांच्या अभावामुळे उघड्यावर शौचास बसतात. शौचालयाची सुविधा उपलब्ध असणे हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे आणि यामुळे आरोग्य निरोगी राहण्यासही मदत मिळते. कारण उघड्यावर शौचास बसल्याने गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो. हेच धोके टाळण्यासाठी ‘जागतिक शौचालय दिन’ साजरा केला जातो

वर्ष २००१ मध्ये सिंगापूरमधील जॅक सिम यांनी जागतिक शौचालय संघटनेची (World Toilet Organization) स्थापना केली. यानंतर वर्ष २०१३ मध्ये 'जागतिक शौचालय दिन' साजरा करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतही मंजूर करण्यात आला होता. संयुक्त राष्ट्र संघाकडूनही अधिकृतरित्या संयुक्त राष्ट्र जागतिक शौचालय दिवसाची घोषण्यात करण्यात आली. तेव्हापासून हा दिवस साजरा केला जात आहे. ‘वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन’ ही संस्था जगभरात स्वच्छता व शौचालयांची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे

◆ जन्म 

१. (१८२८) महान विरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म

त्या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७ च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे

२. (१९१७) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, आयर्न लेडी इंदिरा गांधी यांचा जन्म

या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्या होत्या. १९६६ मध्ये त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत. त्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या

● निधन

१. (१९७१) मराठी लघुकथेचे प्रवर्तक व विनोदी लेखक कॅप्टन गो. गं. लिमये यांचे निधन

लिमये यांनी इ.स. १९१२ पासून मासिक मनोरंजनमध्ये कथा लिहून मराठी कथालेखनाचा प्रारंभ केला. ते मराठीतील वैशिष्ट्यपूर्ण विनोदी लेखक समजले जात

प्रवासवर्णन, आत्मनिवेदन अशा अनेक माध्यमांचा विनोदासाठी लिमये यांनी मोठ्या कुशलतेने उपयोग करून घेतला. त्यामुळे त्यांच्या विनोदी लेखनात लक्षणीय नाट्यमय विविधता आलेली आहे

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर