दिनविशेष १६ नोव्हेंबर
दिनविशेष
दि. १६ नोव्हेंबर
■ दिनविशेष
१. आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन
आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन जगभरात १६ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. असहिष्णुतेचा अंत व्हावा या उद्देशाने 'युनेस्को'ने १६ नोव्हेंबर १९९५ रोजी या दिवसाची घोषणा केली. मानवी मूलभूत हक्कांची जोपासना व्हावी, त्याशिवाय मानवतेची अस्मिता जपताना, मानवी मूल्यामुळे पुढच्या पिढीला युद्धाच्या अरिष्टापासून वाचविण्यासाठी या दिवसाची घोषणा करण्यात आली. त्याशिवाय या दिवसाचे उद्दीष्ट संस्कृती आणि लोक यांच्यात परस्पर समज वाढवून सहिष्णुता वाढविणे हे आहे
मानवाधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्य यासाठी हा दिवस पाळला जातो. जगातील विविध भागांमध्ये राहणाऱ्या वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना एकत्र आणण्याचे काम सहिष्णूतेमुळं होऊ शकते. असहिष्णू वृत्तीशी लढण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे साधन आहे, असे या दिवसाचे उद्देश आहेत
द्वेष पसरवणाऱ्यांचा प्रभाव कमी करण्याचा सर्वोत्तम आणि सोपा मार्ग म्हणजे वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमांचा वापर करणे. लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यातील वस्तुस्थिती लक्षात यावी यासाठी हा मार्ग सोपा आहे. असहिष्णुतेशी लढण्यासाठी, लोकांना त्यांचे स्वतःचे वर्तन आणि समाजातील अविश्वास आणि हिंसाचार यांच्यातील दुव्याची जाणीव असणे आवश्यक आहे
२. युनेस्को स्थापना दिन
१६ नोव्हेंबर १९४५ रोजी लंडनमध्ये युनेस्कोची (संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटन - UNESCO)स्थापना झाली होती. भारत, युएस, चीन, फ्रान्स, ऑस्ट्रेलियासह १९३ देश या संघटनेचे सदस्य आहेत. तर जगभरात याची ५० पेक्षा अधिक कार्यालये आहेत. युनेस्कोचं मुख्यालय पॅरिसमध्ये आहे. युनेस्को हे संयुक्त राष्ट्रांचं एक अंग आहे. यामार्फत जगभरातील विकसनशील राष्ट्रांमध्ये शिक्षण, विज्ञान, सांस्कृतिक यासारख्या महत्वाच्या क्षेत्रामध्ये काम केले जातं. ऐतिहासिक, सांस्कृतीक, नैसर्गिक स्थळांना युनेस्कोकडून जागतिक वारसा हा दर्जा दिला जातो
३. राष्ट्रीय पत्रकारिता दिन
भारतातील स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारितेचे प्रतीक म्हणून दरवर्षी १६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जातो. याच दिवशी प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाने (PCI) काम करण्यास सुरुवात केली. लोकशाहीमध्ये पत्रकारितेला महत्वाचे स्थान राहिले आहे
प्रेस कमिशन १९५६ ने भारतातील पत्रकारितेचे नैतिकता आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी एक समिती स्थापन केली. यांनी १० वर्षांनंतर प्रेस काऊन्सिलची स्थापना केली. प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया विश्वासार्हता राखण्यासाठी सर्व पत्रकारितेच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवते. देशातील सुदृढ लोकशाही राखण्यासाठी प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाची महत्त्वाची भूमिका आहे. हे भारतातील प्रेसवर कोणत्याही बाह्य बाबींचा प्रभाव पडणार नाही याचीही खात्री करते
◆ जन्म
१. (१९२७) मराठी व हिंदी नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील अभिनेते व दिग्दर्शक डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म
देवाला रिटायर करा अशी आरोळी ठोकत त्यांनी पुरोगामी आणि आणि त्यांच्या मते तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला होता
नटसम्राट, हिमालयाची सावली, किरवंत, क्षितीजापासून समुद्र इ. अनेक नाटकांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. प्रभावी चरित्र भूमिकांनी दोन दशके रंगभूमी त्यांनी गाजवली. सामना, पिंजरा, सिंहासन हे प्रमुख मराठी चित्रपट सुपरहिट झाले
२. (१९२८) मराठी संत साहित्यातील विद्वान डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा जन्म
२० स्वलिखित व ७ संपादित पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या लोकहितवादी काळ आणि कर्तृत्व, या प्रबंधास डॉक्टरेट मिळाली. संततुकाराम एक चिंतन व संताचिया भेटी ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत
३. (१९६३) भारतीय चित्रपट अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री यांचा जन्म
दामिनी या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment