दिनविशेष १५ नोव्हेंबर

दिनविशेष

दि. १५ नोव्हेंबर

◆ जन्म 

१. (१८७५) झारखंडमधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा जन्म

कृषी विस्कळीत आणि संस्कृतीच्या बदलाच्या दोन आव्हानांना, बिरसा मुंडेसह यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विद्रोह आणि विद्रोहांच्या मालिकेतून प्रतिसाद दिला. मुंद्यांच्या जमिनीचा खरा मालक म्हणून, आणि मध्यस्थ आणि ब्रिटिशांना निर्वासित करण्याचा हक्क म्हणून आंदोलन करण्याची मागणी केली गेली

२. (१९१७) मराठी संगीतकार दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ ’डी. डी’ यांचा जन्म

हे मराठीतील संगीतकार होते. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना 'डीडी' या टोपणनावानेही ओळखले जाई. इ.स. १९४१ सालापासून त्यांनी चित्रपटांना व मराठी भावगीतांना संगीत दिले होते

दत्ता डावजेकरांनी साधारण ६० च्या वर चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले आहे. राजा परांजपे, गजानन जागीरदार, मास्टर विनायक, दिनकर पाटील, दत्ता धर्माधिकारी, राजदत्त, राजा ठाकूर इत्यादी निर्माते दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलेले आहे. रंगल्या रात्री अशा, पाठलाग, पाहू रे किती वाट, थोरातांची कमळा, पडछाया, चिमणराव-गुंड्याभाऊ, पेडगावचे शहाणे, जुनं ते सोनं, संथ वाहते कृष्णामाई, सुखाची सावली, वैशाख वणवा, मधुचंद्र, यशोदा इत्यादी चित्रपटातील त्यांचे संगीत विलक्षण गाजले. डीडींनी १०-१२ नाटकांचेही संगीत दिग्दर्शन केलेले आहे. त्यापैकी थॅंक यू मिस्टर ग्लाड ह्या नाटकाला संगीत देण्यासाठी त्यांनी जर्मन संगीतही आत्मसात केले. डीडी हे जसे उत्तम संगीतकार होते तसे ते उत्तम कवीही होते. त्यांनी रचलेली आणि गाजलेली काही गीते अशी आहेत

३. (१९२९) कवयित्री शिरीष पै यांचा जन्म

या एक मराठी कवी, लेखिका आणि नाटककार होत्या. शिरीष पै यांनी कथा, कविता, नाटक, ललित लेखन अशा सर्व प्रकारच्या साहित्यात उल्लेखनीय योगदान दिले. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी आचार्य अत्रे यांच्या 'मराठा'मध्ये पत्रकार म्हणून काम केले होते. त्या बी.ए.एल्‌.एल.बी होत्या. त्या १९५६ ते १९६० या काळात नवयुग साप्ताहिकाच्या, १९६१ ते १९६९ या काळात दैनिक मराठाच्या वाङ्मयीन पुरवणीच्या, आणि १९६९ ते १९७६ या काळात दैनिक 'मराठा'च्या संपादक होत्या. वृत्तपत्रांतून त्यांचे अग्रलेख. पुस्तक परीक्षणे, मुलाखती आणि वाड्‌मयीन लेख प्रसिद्ध होत असत. त्यांनी आयुष्याची २५ वर्षे वृत्तपत्र व्यवसायात घालवली. त्यामुळे स्फुटलेखनाची त्यांना सवय होती. त्यांनी राजकीय लेखनही केले

शिरीष पै एक चांगल्या वक्त्या होत्या. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही त्यांनी प्रखर भूमिका निभावली. त्या बोलताना निरागसपणे बोलायच्या. मात्र, त्या बोलण्यामध्ये खूप अर्थ असे. त्यांची भाषा प्रगल्भ होती

शिरीष पै यांनी सन १९७५मध्ये ‘हायकू’ हा जपानी अल्पाक्षरी काव्यप्रकार मराठीत आणला आणि लोकप्रिय केला

४. (१९४८) कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक सुहास शिरवळकर यांचा जन्म

शिरवळकरांनी १९७४ साली रहस्यकथा लेखनास सुरुवात केली. तेव्हापासून १९७९ सालापर्यंत त्यांनी २५० छोट्या मोठ्या रहस्यकथा लिहिल्या. १९८० सालापासून ते 'सामजिक कादंबरी' या साहित्यप्रकाराकडे वळले. 'लोकांना आवडेल ते' अशा मर्यादित अर्थाने त्याकडे न बघता, शिरवळकरांनी आपले साहित्य सवंग दर्जाचे होऊ न देता लेखन केले. रहस्यकथा, १७५ कादंबऱ्यांव्यतिरिक्त त्यांनी लघुकथाही लिहिल्या. या कथांचे पुढे कथासंग्रह झाले. त्यांनी काही बालकथादेखील लिहिल्या. सुहास शिरवळकरांच्या निधनानंतर त्यांनी लिहिलेल्या कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यांच्या 'देवकी' या कथेवर मराठी चित्रपट बनला, तर 'दुनियादारी' कादंबरीवर चित्रपट बनला

५. (१९६१) शिवसेनेचे नेते, धडाडीचे प्रवक्ते, सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक खा. संजय राऊत यांचा जन्म

● निधन

१. (१९८२) भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य, भारतरत्‍न आचार्य विनोबा भावे यांचे निधन

१९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाच्या केलेल्या आंदोलनात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. भूदान यज्ञात विनोबांनी देशभर पदयात्रा केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२ मध्ये 'छोडो भारत' आंदोलनात झाले. भावे पुढे सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले. भावे हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधींसोबत होते

१८ एप्रिल १९५१ रोजी त्यांना पाहिले 'भूदान' मिळाले. पुढे १४ वर्ष ते भूदान मागत फिरले. जनतेने त्यांना ४७ लाख एकर जमीन भुदानात दिली. सुमारे ८ लाख भूमिहीनांना ती वितरित केली. भूदान द्वारे विनोबांनी हृदयपरिवर्तन व समाज परिवर्तन केले

२. (२०१७) प्रसिद्ध हिंदी साहित्यकार कुॅंवर नारायण यांचे निधन

सुरुवातीला त्यांचे नाव हिंदीतील नवकाव्याशी जोडले गेले. कवितेबरोबरच त्यांनी विभिन्‍न साहित्यिक, वैचारिक आणि सांस्कृतिक विषयांवरही लेखन केले. त्यांच्या अनेक साहित्यकृतींचे भारतीय व विदेशी भांषांमध्ये अनुवाद झाले आहेत. कुॅंवर नारायण हे विविध सांस्कृतिक संस्थांशी जोडले गेले आहेत

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर