दिनविशेष १४ नोव्हेंबर
दिनविशेष
दि. १४ नोव्हेंबर
■ दिनविशेष
१. राष्ट्रीय बाल दिन
भारताचे पहिले पंतप्रधान, भारतरत्न पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन १४ नोव्हेंबर राष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा केला जातो
२. जागतिक मधुमेह दिन
मधुमेहावर औषध असलेल्या 'इन्शुलिन'चा शोध लावणाऱ्या फ्रेडरिक बँटिंग यांचा जन्मदिन १४ नोव्हेंबर, दरवर्षी 'जागतिक मधुमेह दिन' म्हणून जगभरात साजरा केला जातो
वाढत्या मधुमेहाविषयी जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने १९९१ पासून हा दिवस 'जागतिक मधुमेह दिन' म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली
आज सुमारे ४६.३ कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. या मधुमेही रुग्णांपैकी ९०% रुग्णांना टाईप-२ मधुमेह आहे. आरोग्य व्यावसायिकांच्या अंदाजानुसार, मधुमेहाच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रकरणांमुळे व्यक्तीचा अकाली मृत्यू होऊ शकतो, त्यामुळे या आजाराबाबत जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून लोक प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करू शकतील. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकता
सध्या मधुमेह ही मोठी समस्या बनली आहे. लहानांपासून तरूण आणि वृद्धांपर्यंत ते आपल्या सर्वांनाच मधुमेहाचा त्रास होऊ शकतो. त्याची दहशत जगभर पसरत आहे. एकदा मधुमेह झाला की तो मुळापासून नष्ट करणे कठीण असते. त्यामुळे ते नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या आजाराने त्रस्त असताना रक्तदाब कमी होणे, मेंदूवर होणारा परिणाम, हृदयाला धोका, जखमा झाल्यानंतर बरी होण्यास वेळ, किडनी पसरणे, दृष्टी कमी होणे अशा अनेक मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते
◆ जन्म
१. (१७९४) थोर क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांचा जन्म
दांड पट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे व निशाणेबाजी या सर्व युद्धकलेमध्ये लहुजी निपुण होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी क्रांतिकारक निर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले
महात्मा फुले यांच्या दलितोद्घारात कार्यास त्यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली, त्यावेळी लहुजींनी स्वत:च्या मुक्ता या पुतणीस या शाळेत पाठविले
२. (१८८९) आधुनिक भारताचे शिल्पकार, भारताचे पहिले पंतप्रधान, भारतरत्न पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म
ते भारतातील एक राष्ट्रवादी, धर्मनिरपेक्ष मानवतावादी, सामाजिक लोकशाहीवादी नेते आणि लेखक होते. नेहरू हे २० व्या शतकाच्या मध्यभागी भारतातील मध्यवर्ती व्यक्ती होते. ते १९३० आणि १९४० च्या दशकात भारतीय राष्ट्रवादी चळवळीचे प्रमुख नेते होते. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी १६ वर्षे देशाचे पंतप्रधान म्हणून काम केले. नेहरूंनी १९५० च्या दशकात संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार केला आणि आधुनिक राष्ट्र म्हणून भारताच्या प्रतिमेवर जोरदार प्रभाव पाडला. आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये त्यांनी भारताला शीतयुद्धाच्या दोन गटांपासून मुक्त केले. एक प्रतिष्ठित लेखक असलेल्या नेहरुंची तुरुंगात लिहिलेली पुस्तके, जसे की लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर (१९२९), ॲन ऑटोबायोग्राफी (१९३६) आणि द डिस्कव्हरी ऑफ इंडिया (१९४६) ही जगभरात वाचली जातात. त्यांच्या हयातीपासूनच सन्माननीय पंडित हे सामान्यतः त्यांच्या नावापुढे भारतात लावले जात होते
पं. नेहरूंचा जन्मदिन १४ नोव्हेंबर राष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा केला जातो. नेहरूंना मुलांबद्दल फार ममत्व होते. ते मुलांमध्ये मिसळत असतं. त्यामुळे त्यांना 'नेहरू चाचा' असेही म्हटले जात
३. (१९२४) मराठी कथ्थक नर्तिका रोहिणी भाटे यांचा जन्म
ज्या काळात भारतात पांढरपेशा घरातील मुलींनी स्टेजवर नृत्य करणे ही प्रथा समाजमान्य नव्हती, त्या काळात एका मराठी मुलीने नृत्य करणे ही गोष्ट धारिष्ट्याचीच होती. पण एकदा घेतलेला निर्णय रोहिणी भाटे यांनी मरेपर्यंत निभावला. त्या बुद्धिमान तर होत्याच शिवाय त्या कविताही करीत. गाण्याचेही त्यांना अंग होते. या सर्वांचा उपयोग त्यांना नृत्यसाधनेसाठी झाला
४. (१९४२) आसामी साहित्यिक आणि कवियत्री इंदिरा गोस्वामी यांचा जन्म
त्या आसामी लेखिका, कवयित्री व संपादिका होत्या. आसामी साहित्यातील त्यांचे योगदान साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८३) व ज्ञानपीठ पुरस्कार (इ.स. २०००) देऊन गौरवण्यात आले. साहित्य वर्तळात या मामुनी रायसोम गोस्वामी या नावाने ओळखल्या जात. 'युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम' (उल्फा) आणि केंद्र सरकारदरम्यान शांतता-करार करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती
● निधन
१. (१९७१) कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायण हरी आपटे यांचे निधन
ते मराठी कादंबरीकार, व्याख्याते आणि प्रकाशक होते. त्यांचे शिक्षण समडोळीला आणि नंतर सातारा येथे झाले. ते किर्लोस्कर खबर (पहिले उपसंपादक), उद्यान, लोकमित्र तसेच आल्हाद साप्ताहिक व मधुकर या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. ‘आपटे आणि मंडळी’ या नावाने प्रकाशनगृह स्थापन केले. प्रकाशन करण्यासाठी स्वतःचा ‘श्रीनिवास छापखाना’ कोरेगाव येथे सुरू केला
’सुखाचा मूलमंत्र’, ’पहाटेपुर्वीचा काळोख’, ’उमज पडेल तर’, ’एकटी’ या त्यांच्या काही प्रसिद्ध सामाजिक कादंबर्या होत. ’कुंकू’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्या ’न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर आधारलेला होता
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment