दिनविशेष ०५ ऑक्टोबर

दिनविशेष 

दि. ०५ ऑक्टोबर

■ दिनविशेष 

१. जागतिक शिक्षक दिन

जागतिक शिक्षक दिन हा दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. भावी पिढी समर्थ बनविण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनविणे हा या दिनाचा उद्देश आहे. युनेस्कोतर्फे हा दिवस इ.स. १९९४ पासून जगभर सुमारे १०० पेक्षा जास्त देशांमध्ये पाळला जात आहे. या दिवशी इ.स. १९६७ मध्ये युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय श्रम संघटन यांनी शिक्षकांचा दर्जा या विषयावरील शिफारशीवर सह्या केल्या होत्या. एज्युकेशन इंटरनशनल या संघटनेतर्फे सुद्धा हा दिवस जगभर पाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत

◆ जन्म 

१. (१९२२) भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, उत्कृष्ट लेखक व संपादक आणि साहित्यिक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचा जन्म

साने गुरुजी यांचा त्याच्यावर प्रभाव होता. ते 'साधना साप्ताहिका'चे संपादक होते

● निधन

१. (१९९१) इंडियन एक्‍स्प्रेस वृत्तपत्रसमूहाचे संस्थापक अध्यक्ष आणि स्वातंत्र्यचळवळीतील ज्येष्ठ नेते रामनाथ गोयंका यांचे निधन

ते इंडियन एक्‍स्प्रेस वृत्तपत्रसमूहाचे संस्थापक अध्यक्ष आणि स्वातंत्र्यचळवळीतील ज्येष्ठ नेते होते. रामनाथ गोएंका एक भारतीय वृत्तपत्र प्रकाशक होते. १९३२ मध्ये त्यांनी इंडियन एक्स्प्रेस सुरू केली आणि विविध इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेच्या प्रकाशनातून इंडियन एक्सप्रेस ग्रुप तयार केला. रामनाथ गोएंका यांच्या नावाने ओळखले जाणारे रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम अवॉर्ड हे भारतीय पत्रकारांसाठी सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक बनले आहेत

२. (२०११) ॲपल ह्या जगप्रसिद्ध कंपनीचे सहसंस्थापक व मुख्याधिकारी स्टीव जॉब्स यांचे निधन

स्टीव जॉब्स यांना उपभोक्ता संगणकक्षेत्रातील नवीनतेचे व अविष्कारचे जनक म्हणून संबोधले जाते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर