दिनविशेष २४ ऑक्टोबर

दिनविशेष

दि. २४ ऑक्टोबर

★ महत्वपूर्ण घटना

१. (१९४५) संयुक्त राष्ट्र संघाची (United Nations) स्थापना

संयुक्त राष्ट्र संघ (United Nations) ही आंतरराष्ट्रीय विधी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्वशांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्टे असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. 'संयुक्त राष्ट्र संघ' ची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाच्या जागी देशा-देशांमधील युद्धे थांबविण्यासाठी आणि संवादासाठी अधिष्ठान पुरविण्याच्या उद्देशाने झाली होती. ही संस्था स्थापन करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला होता, पण भारताचे या संस्थेच्या कामापासून नेहमी अलिप्त राहण्याचे धोरण राहिले आहे. आपले कार्यक्रम रावबिण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अनेक दुय्यम संस्था आहेत

 ■ दिनविशेष 

१. जागतिक पोलिओ दिवस

जागतिक पोलिओ दिवस दरवर्षी २४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. रोटरी इंटरनॅशनलने पोलिओमायलिटिस विरूद्ध लस विकसित करणाऱ्या जोनास साल्क यांच्या जन्माच्या स्मरणार्थ याची सुरुवात केली होती. जानेवारी २०१४ मध्ये भारत हा पोलिओ मुक्त देश जाहीर करण्यात आला

२. धम्मचक्र प्रवर्तन दिन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ५,००,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला. विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला

३. मराठा आरमार दिवस

छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या २७ व्या वर्षी २४ ऑक्टोबर १६५७ रोजी सर्वप्रथम सागरी आरमार उभे करून स्वराज्याला नवी दिशा दिली. म्हणून हा दिवस मराठा आरमार दिवस म्हणून साजरा केला जातो

छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असेही म्हटले जाते. १६५६ साली शिवाजी महाराजांनी जावळी काबीज केली, त्यामुळे कोकणाचा बराचसा भाग स्वराज्यात आला. ऑक्टोबर १६५७ मध्ये महाराजांनी कल्याण आणि भिवंडीचा परिसर आपल्या ताब्यात घेतला. मिळालेल्या या प्रदेशाच्या संरक्षणासाठी व सिद्दी व युरोपियनच्या कुरापती थांबवण्यासाठी व त्यांना सागरी मार्गाने मिळणारी रसद तोडण्यासाठी शिवाजी महाराजांना आरमारची गरज भासू लागली आणि यातुनच त्यांनी २४ ऑक्टोबर १६५७ मध्ये भिवंडी, कल्याण व पेण मध्ये पहिल्या जहाजाची निर्मिती केली

◆ जन्म 

१. (१८६८) औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, व्यायाम विषयक पुस्तकांचे कर्ते बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचा जन्म

भवानराव पंतप्रतिनिधी हे धार्मिक होते, पण दैववादी नव्हते. मानवी सामर्थ्यावर व कर्तृत्वाचर त्यांचा विश्वास होता. उद्योगाचे महत्त्व त्यांना पुरेपूर पटलेले होते. बहात्तर खेडी आणि अठ्ठेचाळीस वाड्या एवढाच विस्तार असलेले आपले संस्थान उद्योग-व्यवसायांनी फुलावे, फळावे असे स्वप्न त्यांनी पाहिले. संस्थानांतील शाळांमधून तंत्रशिक्षण देण्यावर त्यांचा कटाक्ष होता

भवानरावांना साहित्य, संगीत, शिल्प, चित्र यांची विशेष आवड होती. चित्रकारांचे ते आश्रयदाते होते. दरवर्षी राजेसाहेब औंधमध्ये कला प्रदर्शन भरवीत. त्यांनी राजे-रजवाड्यांकडून जुनी चित्रे विकत घेतली. परदेशी जाऊन पाश्चात्त्य चित्रकारांची काही चित्रे भारतात आणली. काही दुर्मीळ चित्रांच्या नकला करवून आणल्या. आणि या चित्रा-शिल्पांसाठी औंधमध्ये ए्क वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय उभारले

२. (१९१०) मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री लीलाबाई (माई) भालजी पेंढारकर यांचा जन्म 

१९३० सालच्या प्रभात फिल्म कंपनीच्या 'उदयकाल' मूकपटातून लीलाबाई पेंढारकरांनी भुमिका साकारली व त्यानंतर सुरू झालेल्या बोलपट युगातही लीला चंद्रगिरींनी प्रभातच्या 'अग्निकंकण', 'सिंहगड', 'माया मच्छिंद्र'मधून भूमिका साकारल्या. बोलपटांच्या सुरुवातीच्या काळात काही गाणी देखील लीला चंद्रगिरी यांनी गायली होती

१९३३ च्या भारतीय चित्रपटसृष्टीतील 'सैरंध्री' या पहिल्या रंगीत चित्रपटाच्या नायिका होण्याचा बहुमान देखील लीलाबाई पेंढारकर यांना मिळाला. त्यानंतर लीलाबाई भालजींच्या चित्रपटांकडे वळल्या. छत्रपती शिवाजी मधून राजामाता जिजाबाईंची भूमिका अजरामर करणाऱ्या अभिनेत्री लीला पेढारकरांच्या नावाला कलेच्या विश्वात अनोखे वलय प्राप्त झाले. त्यासोबतच सावित्री चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली

३. (१९१४) आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा जन्म

या पेशाने डॉक्टर होत्या. १९४३ साली त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत राणी लक्ष्मीबाई रेजिमेंटच्या कर्नल म्हणून जबाबदारी सांभाळली. लक्ष्मी सहगल या कॅप्टन लक्ष्मी या नावाने ओळखल्या जात

४. (१९२१) व्यंगचित्रकार, 'द कॉमन मॅन' पात्राचे निर्माते आर. के. लक्ष्मण यांचा जन्म 

ते एक भारतीय व्यंगचित्रकार, चित्रकार आणि विनोदी लेखक होते. आर. के. लक्ष्मण या नावाने ते ओळखले जात. ते त्यांच्या 'द कॉमन मॅन' च्या निर्मितीसाठी आणि १९५१ मध्ये सुरू झालेल्या टाइम्स ऑफ इंडियातील 'यू सेड इट' या त्यांच्या दैनिक व्यंगचित्रांसाठी अत्यंत प्रसिद्ध होते

● निधन

१. (१९९२) मराठी नवकथेचे जनक लेखक अरविंद गोखले यांचे निधन

ते एक मराठी लघुकथा लेखक होते. अरविंद गोखले यांच्या अनेक कथांचे युरोपीय व भारतीय भाषांतून अनुवाद झाले आहेत. स्वतंत्र कथालेखनाखेरीज काही वेचक अमेरिकन कथांचे अनुवाद त्यांनी केले आहेत

२. (२०१३) पार्श्वगायक मन्ना डे यांचे निधन

ते हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक व संगीतकार होते. मराठी भाषेमध्ये मन्ना डे यांनी गाणी गायली आहेत. त्यातले -घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा- हे ‘वरदक्षिणा’ चित्रपटातील ग.दि. माडगूळकर यांचे गीत आणि वसंत पवार यांचे संगीत असलेले हे गाणे विशेष लोकप्रिय आहे

३. (२०१७) शास्त्रीय गायिका गिरीजा देवी यांचे निधन

त्या बनारस घराण्याचा वारसा चालविणाऱ्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्या शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत गायनासाठी, तसेच ठुमरीला अधिक समृद्ध स्थान देण्यासाठी विशेष ओळखल्या जात

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर