दिनविशेष २१ ऑक्टोबर
दिनविशेष
दि. २१ ऑक्टोबर
■ दिनविशेष
१. पोलीस स्मृती दिन
२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांना वीर मरण आले होते. तेव्हा पासून २१ ऑक्टोबर हा पोलिस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो
वर्षभरात जे जवान देशात आणि राज्यात शहीद झाले अशा जवानांना या २१ ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली वाहिली जाते. जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये या निमित्ताने शहीद पोलिसांना अभिवादन करण्यात येते. यासोबतच विविध उपक्रमाचे आयोजनही करण्यात येते
◆ जन्म
१. (१८३३) स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म
नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या पाच क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक नोबेलने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली होती. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला. दरवर्षी १० डिसेंबर रोजी या पुरस्काराचे वितरण केले जाते
२. (१९१७) मराठी गायक व संगीतकार राम फाटक यांचा जन्म
रामभाऊंनी ’संतवाणी’ मधील 'तीर्थ विठ्ठल', 'माझे माहेर पंढरी', 'पंढरी निवासा', 'अणुरेणीया थोकडा' हे पंडित भीमसेन जोशींकडून गाऊन घेतलेले अभंग खूपच लोकप्रिय झाले. ह्याबरोबरच 'दिसलीस तू', 'डाव भांडून मांडून मोडू नको' आणि 'सखी, मंद झाल्या तारका' ही सुधीर फडक्यांनी गायलेली भावगीते प्रचंड गाजली. रामभाऊ फाटक यांनी 'स्वरयात्रा' या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment