दिनविशेष २० ऑक्टोबर

दिनविशेष

दि. २० ऑक्टोबर

■ दिनविशेष 

१. जागतिक सांखिकी दिवस (World Statistics Day)

जागतिक सांख्यिकी दिन दर पाच वर्षांनी २० ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. पहिला जागतिक सांख्यिकी दिन २०१० साली साजरा करण्यात आला. मानवी जीवनात संख्याकीचे महत्त्व ओळखण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सेवा, व्यावसायिकता आणि सचोटी या मूल्यांवर आधारित अधिकृत आकडेवारीच्या सिद्धी बद्दल जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. शेवटचा जागतिक सांख्यिकी दिवस २० ऑक्टोबर २०२० रोजी साजरा करण्यात आला. वर्ष २०२५ मध्ये पुढील जागतिक सांख्यिकी दिन साजरा करण्यात येणार आहे

शैक्षणिक संशोधन आणि नागरी समाज आणि व्यवसायांच्या विकासामध्ये आकडेवारीच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करते. सांख्यिकी कोणत्याही देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी अपरिहार्य असतात आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतात. समाजाच्या भल्यासाठी मोठ्या प्रमाणावर डेटा गोळा करणे त्यांचे विश्लेषण करणे आणि त्यांचा अर्थ लावणे हे त्याचे उद्दिष्ट असते

२. जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन

हाडे किंवा फ्रॅक्चर इत्यादींशी संबंधित समस्यांबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी 'जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन' दरवर्षी २० ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो

हाडांचे फ्रॅक्चर टाळण्यासाठी आणि त्यांच्या उपचारांबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. युनायटेड किंगडमच्या नॅशनल ऑस्टिओपोरोसिस सोसायटीनं २० ऑक्टोबर १९९६ रोजी 'जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन' सुरू केला. इंटरनॅशनल ऑस्टियोपोरोसिस फाउंडेशनने १९९७ पासून या दिवसाला पाठिंबा दिला आणि तेव्हापासून हा दिवस दरवर्षी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेनं १९९८ आणि १९९९ मध्ये २० ऑक्टोबर हा 'जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस' म्हणून साजरा केला

३. आंतरराष्ट्रीय शेफ डे (International Chef Day)

आंतरराष्ट्रीय शेफ डे दरवर्षी २० ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस शेफ साजरे करतात आणि निरोगी खाण्याविषयी जागरूकता पसरवतात

◆ जन्म 

१. (१९१६) आपल्या प्रतिभेतून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत स्फुल्लिंग चेतवणारे लोकशाहीर अमर शेख यांचा जन्म

ते एक नामवंत लोकशाहीर होते. त्यांना विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्तिसंग्राम यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शाहीर अमर शेख यांनी लोककलेच्या माध्यमातून समाजाला जागे करण्याचे व्रत स्वीकारले होते

त्यांच्या लोककलेला क्रांतीची धग होती, म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, गोवा मुक्ती आंदोलन असो किंवा मुंबईतील गिरणी कामगारांच्या समस्या असोत, त्यांच्या लेखणीने आणि आवाजाने समाजाला जागे केले होते. पोवाडे, गीते, लोकगीते, लोकनाट्ये लिहून विचारांचा प्रसार त्यांनी केला होता. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनमानसात आदराचे स्थान मिळालेले लोकशाहीर होते. आपल्या शाहिरीद्वारे जनमानसात नवचेतना निर्माण करण्याचे काम शाहीर अमर शेख यांनी केले. कामगारांच्या दुःखाला वाचा फोडत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले

● निधन

१. (१९७४) प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा मास्टर कृष्णराव यांचे निधन


ते  हिंदुस्तानी संगीत पद्धतीतील गायक व मराठी संगीत नाटकांमधील संगीतकार आणि गायक-अभिनेते होते. गायनाचार्य भास्करबुवा बखल्यांचे ते पट्टशिष्य होते. त्यांच्या गायनात ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर घराण्यांचा संगम दिसून येई. ’वंदे मातरम’ला त्यांनी दिलेली चाल लोकप्रिय ठरली

२. (२००९) चित्तथरारक व खिळवून ठेवणाऱ्या अनेक गुप्तहेरकथा, कादंबऱ्या लिहणारे मराठी लेखक वीरसेन आनंदराव तथा ’बाबा’ कदम यांचे निधन

त्यांच्या कथा, कादंबर्‍यात ऐतिहासिक पार्श्वभूमी, संस्थानिक गढ्या, वाडे, सरंजामी सदर बोली भाषा, पोलीस, कायदा, कोर्ट, रेसकोर्स यांचा उल्लेख प्रामुख्यानं आला. 

कथा संग्रह - ऑरेंज ज्यूस, गजरा
व्यक्तिचित्रे-चरित्रे - चौफेर
कादंबरी - डोंगराची मैना, तुफान, दगा, एक होती बेगम, कॉकटेल सर्किट

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर