दिनविशेष १८ ऑक्टोबर
दिनविशेष
दि. १८ ऑक्टोबर
★ महत्वपूर्ण घटना
१. (१९२२) ब्रिटिश ब्रॉडकस्ट अससोसिएशन (BBC) ची स्थापना
ही जागतिक पातळीवरील लंडन स्थित वृत्तवाहिनी आहे
■ दिनविशेष
१. जागतिक रजोनिवृत्ती दिन
जागतिक रजोनिवृत्ती दिन दरवर्षी १८ ऑक्टोबर रोजी रजोनिवृत्तीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि महिलांचे आरोग्य आणि कल्याण सुधारण्यासाठी उपलब्ध असलेल्या समर्थन पर्यायांसाठी साजरा केला जातो
◆ जन्म
१. (१८६१) न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक, आणि इंग्रजी व संस्कृतचे जाणकार भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांचा जन्म
वैद्यांनी १८८९ ते १९३४ या काळात सुमारे ५०,००० पृष्ठे इतके लेखन इंग्रजी-मराठीत केले. त्यांचे स्फुटलेखन केसरी, विविध ज्ञानविस्तार, इंदुप्रकाश, नेटिव्ह ओपिनियन आदी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. यांपैकी फारच थोडे लेखन ग्रंथरूपात आले. त्यांचे एकूण २९ ग्रंथ प्रकाशित झाले, पैकी ९ ग्रंथ इंग्रजीत आणि २० मराठीत होते
२. (१९५०) चरित्र अभिनेते ओम पुरी यांचा जन्म
ते एक भारतीय अभिनेते होते. त्यांनी अनेक हिंदी तसेच ब्रिटिश, अमेरिकन, पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम केले. ओम पुरी यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९७६ साली घाशीराम कोतवाल या मराठी चित्रपटाने झाली. अर्ध सत्य (१९८२) या चित्रपटामध्ये पोलीस अधिकार्याच्या भूमिकेसठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ओम पुरी यांनी सुमारे ३०० चित्रपटांत भूमिका केल्या
● निधन
१. (१९५१) पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचे निधन
शिक्षणामुळेच स्त्रियांची स्थिती सुधारेल, असा त्यांना विश्वास होता, आणि स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी ते सिद्ध करून दाखवले. त्यांच्या घराण्यातच नृत्य, संगीत या कला होत्या. त्यांना चागले संस्कृत येत होते. त्यांचे संगीतातले अधिक शिक्षण भास्करबुवा बखले यांच्याकडे झाले
२. (१९८७) कम्युनिस्ट कार्यकर्ते वसंतराव तुळपुळे यांचे निधन
कार्ल मार्क्सच्या ’दास कापिटाल’ या ग्रंथाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला होता
३. (१९९३) भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बाल अभिनेत्री मंदाकिनी विश्वनाथ आठवले यांचे निधन
दादासाहेब फाळके यांच्या त्या कन्या होत
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment