दिनविशेष १७ ऑक्टोबर

दिनविशेष
 
दि. १७ ऑक्टोबर

■ दिनविशेष 

१. जागतिक दारिद्रय निर्मूलन दिन

दरवर्षी १७ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय दारिद्रय निर्मूलन दिन (International Day for the Eradication of Poverty) जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो. १९९२ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने यास अधिकृतपणे मान्यता दिल्यावर दरवर्षी १७ ऑक्टोबर हा दिवस जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला

जगभरातील खासकरून विकसनशील देशांमध्ये दारिद्रय निर्मूलनाबाबत जागरूकता वाढविणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे

◆ जन्म

१. (१८६९) अष्टपैलू व चतुरस्त्र शैलीचे ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिभावान गायक, बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांचे गुरू, ’भारत गायन समाज’ या संस्थेचे संस्थापक ’गायनाचार्य’ पं. भास्करबुवा बखले यांचा जन्म

ते मराठी हिंदुस्तानी संगीत परंपरेतले गायक, संगीतकार होते. भास्करबुवा बखले यांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर या घराण्यांच्या गायकींवर प्रभुत्व मिळवले. नाट्यगीत, ठुमरी, भजन, टप्पा, पंजाबी लोकसंगीत, लावणी, गझल, ध्रुपद धमार, आणि ख्यालगायन या सगळ्यांवर भास्करबुवांची विलक्षण हुकमत होती. संगीतकलेवरील त्यांचे प्रभुत्व पाहून लोक त्यांना देवगंधर्व म्हणू लागले

२. (१८९२) कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार, नारायणराव सोपानराव बोरावके यांचा जन्म 

१९३३ मध्ये त्यांना रावसाहेब तर १९४६ मध्ये त्यांना रावबहादूर  हे किताब मिळाले. शेतीच्या आधुनिकीकरणावर त्यांनी भर दिला

३. (१९५५) प्रसिद्ध चित्रपट, दूरचित्रवाणी अभिनेत्री स्मिता पाटील यांचा जन्म 

नैसर्गिक आणि संवेदनशील अभिनय, मोहक रूप आणि निखळ हास्याची व्याख्या म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील. आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या स्मिता पाटील यांची चित्रपटातील कारकीर्द केवळ दहा वर्षांची असली तरी स्मिता पाटील आजही प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय आहेत

स्मिता पाटील यांनी जेमतेम एक दशकभराच्या कारकिर्दीत ८० हून अधिक हिंदी, बंगाली, मराठी, गुजराती, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचे ’निशांत’, ’मंथन’, ’भूमिका’, ’जैत रे जैत’, ’गमन’, ’चक्र’, ’उंबरठा’ इत्यादी चित्रपट लोकप्रिय झाले

अभिनयाव्यतिरिक्त स्मिता पाटील या सक्रिय स्त्रीवादी आणि मुंबईतील महिला केंद्राच्या सदस्या होत्या. महिलांच्या समस्यांच्या प्रगतीसाठी त्या मनापासून वचनबद्ध होत्या आणि पारंपारिक भारतीय समाजातील महिलांची भूमिका, त्यांची लैंगिकता आणि शहरी वातावरणात मध्यमवर्गीय महिलांना तोंड देत असलेल्या बदलांचा शोध घेणाऱ्या चित्रपटांमधून त्यांनी काम केले

● निधन

१. (१८८२) मराठी व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे निधन

ते मराठी व्याकरणकार, लेखक आणि समाजसुधारक होते. दादोबा पांडुरंग तर्खडकर हे प्रार्थना समाजाचे अर्धयु होते त्यांच्या प्रयत्नातूनच प्रार्थना समाजाची स्थापना झाली. इंग्रज सरकारने त्यांना रावबहादूर ही पदवी दिली. त्यांनी संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करुन व मराठी भाषेच्या रुपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून त्यांनी व्याकरण सिद्ध केले. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही त्यांनी लिहिले. त्यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणतात

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर