दिनविशेष ०६ सप्टेंबर

दिनविशेष

दि. ०६ सप्टेंबर

◆ जन्म 

१. (१९०१) भारतातील पहिल्या महिला, बाल स्त्री-कलाकार कमलाबाई कामत यांचा जन्म

दादासाहेब फाळके यांच्या मोहिनी भस्मासूर या मुकपटात त्यांनी पहिली भूमिका केली. २०० पेक्षा अधिक नाटकं व ३५ पेक्षाही अधिक चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या

२. (१९३७) लेखक, कथा कथनकार आणि स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार वसंत गोविंद पोतदार यांचा जन्म

पोतदारांना संगीत दिग्दर्शक सी.रामचंद्र यांनी १९६२ साली स्वतःचे साहाय्यक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले. पु.ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोतदार यांनी ‘वंदे मातरम्’च्या क्रांतिगाथेवर भारतभर हिंडून एकपात्री प्रयोग केले

 ● निधन

१. (१९७२) जगप्रसिद्ध सरोदवादक आणि संगीतकार अल्लाउद्दीन खॉं यांचे निधन

ते एक भारतीय संगीतज्ञ व अभिजात भारतीय संगीतातील मैहर घराण्याचे प्रवर्तक होते. ते सरोदवादनातील श्रेष्ठतम वादक मानले जातात

२. (१९९५) बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणाऱ्याद माँ साहेब तथा मीनाताई ठाकरे यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर