दिनविशेष ०१ ऑक्टोबर

दिनविशेष 

दि. ०१ ऑक्टोबर

■ दिनविशेष 

१. जागतिक जेष्ठ नागरिक दिन

ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा एक महत्वपूर्ण घटक आहे, ज्येष्ठ नागरिकांना समाजात योग्य तो सन्मान मिळावा, त्यांचे राहणीमान सुसह्य व्हावे, आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात व त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव व्हावी यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. ज्येष्ठांच्या सन्मानार्थ १ ऑक्टोबर हा दिवस जगभर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो

२. जागतिक शाकाहारी दिन

जागतिक शाकाहारी दिन दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिन साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना शाकाहारी पदार्थांच्या फायद्यांची जाणीव करून देणे हा आहे
 
३. जागतिक कॉफी दिन

जागतिक कॉफी दिन दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. कॉफी व्यवसायाशी संबंधित असलेल्या कॉफीशी संबंधित व्यक्तींच्या प्रयत्नांना ओळखणे हा या दिवसाचा उद्देश आहे. कॉफी पिण्यास प्रोत्साहित करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. इंटरनॅशनल कॉफी ऑर्गनायझेशनने २०१५ मध्ये इटलीतील मिलान येथे पहिला जागतिक कॉफी दिन आयोजित केला होता

◆ जन्म 

१. (१८४७) स्वातंत्र्यसैनिक डॉ. अ‍ॅनी बेझंट यांचा जन्म

त्या इंग्लंडमध्ये जन्मलेल्या भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि तत्त्वज्ञानी होत्या. लेखिका आणि व्याख्यात्या म्हणून विख्यात होत्या. त्या स्त्री-सुधारणावादी होत्या

अ‍ॅनी बेझंट यांचे जीवन भारतीय अध्यात्मामुळे फुलले. 'थिऑसॉफिकल सोसायटी' ही त्यांची संघटना. भारतीय तत्त्वज्ञान, संस्कृती व अध्यात्म यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्या सहभागी झाल्या. १९१७ च्या कलकत्त्याच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते

२. (१९०६) संगीतकार आणि गायक सचिन देव बर्मन यांचा जन्म

ते हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार व पार्श्वगायक होते

३. (१९१९) गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर यांचा जन्म

ते विख्यात मराठी कवी, गीतकार, लेखक आणि अभिनेते होते. ते त्यांच्या नावाची आद्याक्षरे ग.दि.मा. या नावाने लोकप्रिय आहेत. गदिमांची सर्वात उल्लेखनीय रचना असलेल्या गीतरामायणची बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत

गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. ते काही काळ विधानपरिषदेचे नियुक्त सदस्यही होते

● निधन

१. (१९३१)  नाट्यछटाकार, लेखक दिवाकर तथा शंकर काशिनाथ गर्गे यांचे निधन

ते मराठी लेखक होते. मराठीत नाट्यछटा हा लेखनप्रकार रुजवण्याचे श्रेय दिवाकर यांना दिले जाते. त्यांनी एकूण ५१ नाट्यछटा लिहिलेल्या आहेत. 'महासर्प' ही त्यांनी लिहिलेली पहिली नाट्यछटा होय. 'मग तो दिवा कोणता', 'पंत मेले राव चढले', 'वर्डस्वर्थचे फुलपाखरूं', 'चिंगी महिन्याची झाली नाही तोच', 'शिवी कोणा देऊं नये', 'फाटलेला पतंग' इ. त्यांच्या विशेष गाजलेल्या नाट्यछटा आहेत. पंत मेले राव चढले या नाट्यछटेच्या नावानेच वाक्प्रचारही मराठीत रुजलेला आहे

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर