दिनविशेष ३० सप्टेंबर

दिनविशेष 

दि. ३० सप्टेंबर

■ दिनविशेष

१. जागतिक भाषांतर दिन

जागतिक भाषांतर दिवस हा दरवर्षी ३० सप्टेंबरला बायबलचे अनुवादक आणि भाषांतराचे जनक, संत जेरॉम यांच्या स्मृत्यार्थ साजरा केला जातो. इंटरनॅशनल फेडरेशन फॉर ट्रान्सलेटर्सच्या स्थापनेपासून म्हणजेच १९५३ मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. जागतिकीकरणाच्या ह्या युगात लोकांना जागृत करण्यासाठी १९९१ मध्ये मध्ये इंटरनॅशनल फेडरेशन फॉर ट्रान्सलेटर्सने जागतिक पातळीवर हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली

★ घटना

१. (१९९३) किल्लारी जि. लातूर येथे मोठा भूकंप झाला होता

३० सप्टेंबर १९९३ रोजी किल्लारी जि. लातूर येथे मोठा भूकंप झाला होता. गणपती विसर्जनानंतरचा तो दिवस होता. सारा महाराष्ट्र साखर झोपेत असताना लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि आजूबाजूची गावं भूकंपाने हादरून गेली. हजारो लोक झोपेतच गाडले गेले. ६.४ रिश्टर स्केलच्या या भूकंपाने सात हजारांवर लोकांचा बळी घेतला, १६ हजार लोक जखमी झाले. तर ५२ गावांतील ३० हजार घरं धरणीच्या पोटात गडप झाली. ही आपत्ती नव्हती तर महाप्रलय होता

◆ जन्म 

१. (१९४६) जेष्ठ पत्रकार, लेखक निळू दामले यांचा जन्म

निळू दामले हे मराठी भाषेतील एक लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक आहेत. दामले ह्यांनी माणूस, महाराष्ट्र टाइम्स, लोकप्रभा, किर्लोस्कर, मनोहर अशा नियतकालिकांतून लिखाण केले आहे. मराठी नियतकालिकांसोबतच त्यांनी धर्मयुग, दिनमान ह्यांसारख्या हिंदी नियतकालिकातही लेखन केले. महाराष्ट्रातल्या विद्यापीठांतून त्यांनी पत्रकारिता आणि संवाद या विषयांवर अभ्यागत प्राध्यापक म्हणून अध्यापन केले आहे

● निधन

१. (२००३) मराठी दिग्दर्शक राजीव पाटील यांचे निधन

जोगवा, ७२ मैल एक प्रवास, सावरखेड एक गाव हे त्यांचे चित्रपट

२. (२००७) विनोदी मराठी अभिनेते, नाटककार, निर्माते, दिग्दर्शक, मालवणी भाषेतील प्रसिद्ध कलाकार मच्छिंद्र कांबळी यांचे निधन

त्यांनी मालवणी बोली मराठीत लोकप्रिय केली. ते मालवणी भाषेवर निस्सीम प्रेम करणारे कलाकार होते. ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्षही होते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर