दिनविशेष २५ सप्टेंबर

दिनविशेष 

दि. २५ सप्टेंबर

■ दिनविशेष 

१. जागतिक फार्मासिस्ट दिन

आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आणि विविध रोगांवर उपचार करण्यात डॉक्टरांसोबतच फार्मासिस्टचीही मोठी भूमिका आहे, फार्मासिस्टना 'केमिस्ट' देखील म्हटले जाते. ही अशी व्यक्ती आहे ज्याला औषधांबद्दल पूर्ण माहिती आहे. फार्मासिस्ट लोकांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असतात
 
आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल फेडरेशन (FIP) च्या नेतृत्वाखाली दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी जागतिक फार्मासिस्ट दिन (World Pharmacist Day) आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो, त्याचा उद्देश जगातील सर्व फार्मासिस्टचे आभार मानणे आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणे हा आहे. यासोबतच १९ ते २५ सप्टेंबर दरम्यान जागतिक फार्मासिस्ट सप्ताहाचे आयोजन करण्यात आले

इस्तंबूल (तुर्की) येथे आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल फेडरेशनद्वारे २००९ मध्ये याची सुरुवात झाली. आणि यासाठी २५ सप्टेंबर ही तारीख निवडण्यात आली कारण हा दिवस १९१२ मध्ये स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल फेडरेशनचा (FIP) स्थापना दिवस होता

◆ जन्म

१. (१९२०) भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमच्या वाटचालीत महत्वाचे योगदान देणारे ख्यातनाम संशोधक सतिश धवन यांचा जन्म

त्यांचे भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमच्या वाटचालीत महत्त्वाचे योगदान होते. ते भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्यानंतर ISRO (Indian Space Research Organisation) चे १९७२ साली अध्यक्ष झाले. त्यांना भारतातील प्रायोगिक fluid dynamicsच्या संशोधनाचे जनक मानले जाते. त्यांच्या स्मरणार्थ श्रीहरीकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण स्थळाचे सतीश धवन अंतराळ केंद्र असे नामकरण करण्यात आले

२. (१९२२) स्वातंत्र्य सैनिक आणि घटना तज्ञ बॅ. नाथ पै यांचा जन्म

ते एक मराठी स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ज्ञ होते. भारतीय लोकसभेचे ते सभासद होते. ते एक फर्डे वक्ते होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांच्या वक्तृत्वाने सभेची रंगत वाढत असे

३. (१९२६) अभिनेते, नाटककार, दिग्दर्शक, कवी बाळ कोल्हटकर यांचा जन्म  

ते मराठीतील नाटककार, कवी, अभिनेते व नाट्यदिग्दर्शक होते. यांनी लिहिलेल्या दुरिताचे तिमिर जावो, वाहतो ही दुर्वांची जुडी, मुंबईची माणसे, एखाद्याचे नशीब इत्यादी नाटकांचे हजारांहून अधिक प्रयोग झाले. तीन दशकांच्या साहित्यिक कारकिर्दीत यांनी ३० हून अधिक नाटके लिहिली

४. (१९२८) लेखक व पत्रकार माधव गडकरी यांचा जन्म 

एक झुंझार पत्रकार, संपादक, सिद्धहस्त लेखक, फर्डे वक्ते म्हणून माधव गडकरी यांना अवघा महाराष्ट्र ओळखतो. २ एप्रिल १९८४ रोजी माधव गडकरी 'लोकसत्ता'चे संपादक म्हणून रुजू झाले आणि २४ सप्टेंबर १९९२ पर्यंत, म्हणजे सुमारे साडेआठ वर्षं ते संपादकपदी होते. या कारकीर्दीने त्यांच्या पत्रकारितेतील कार्यावर कळस चढवला. त्यांनी महाराष्ट्र तसेच विविध देशांतील भ्रमंतीवर विपुल लेखन केलं असून चरित्रलेखनही केलं आहे. याशिवाय त्यांच्या लेखांचे-अग्रलेखांचे खंडही प्रकाशित झाले आहेत

५. (१९३९) अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, माथाडी कामगार चळवळीचे जनक, मराठा आरक्षणाचे प्रणेते अण्णासाहेब पाटील यांचा जन्म 

पाटील यांनी माथाडी कामगारांना‎ न्याय मिळवून देण्यासाठी आपले‎ आयुष्य झिजविले. त्यांच्या उज्वल‎ भवितव्यासाठी वेळोवेळी‎ शासनस्तरावर देखील लढा उभारून‎ माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला. मराठा समाजाला आरक्षण‎ मिळावे यासाठी देखील अण्णासाहेब‎ पाटील यांनी सर्वांना एकजूट‎ करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना केली

● निधन

१. (२००४) भारतीय कवी अरुण कोल्हटकर यांचे निधन

ते मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांत कविता करणारे भारतीय कवी होते. १९५०–१९६० च्या दशकांत त्यांनी लिहिलेल्या कविता या मुंबईतील विशिष्ठ बोली मराठीतल्या असून त्यात मुंबईत आलेल्या निर्वासितांच्या व गुन्हेगारांच्या जीवनाचे दर्शन घडते. उदाहरणार्थ, मै भाभीको बोला / क्या भाईसाबके ड्यूटीपे मै आ जाऊ? / भड़क गयी साली / रहमान बोला गोली चलाऊॅंगा / मै बोला एक रंडीके वास्ते? / चलाव गोली गांडू

२. (२०१३) प्रसिद्ध नाटककार, लेखक श. न. नवरे यांचे निधन

ते मराठी लेखक, नाटककार व पटकथाकार होते. मध्यमवर्गीय माणसाचे अनुभव व भावनाविश्व रेखणाऱ्या कथानकांसाठी ते ओळखले जातात. शन्नाडे या नावाने त्यांनी वृत्तपत्रांतूनही स्तंभलेखन केले आहे. त्यांचे एकूण २७ कथासंग्रह आहेत. शं.ना. नवरे यांनी जयवंत दळवी यांच्या महानंदा कादंबरीवरून ’गुंतता हृदय हे’ हे नाटक लिहिले आहे. हे नाटक अमाप गाजले

डोंबिवलीत झालेल्या २००३ सालच्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना लेखनातून मिळणाऱ्या पैशांचा मोठा हिस्सा ते पडद्यामागच्या कलाकारांसाठी खर्च करीत असत. कायम पडद्यामागे काम करणाऱ्या नाट्यकर्मींसाठी त्यांनी नाट्यसंमेलनातच ७५ हजार रुपयांचा धनादेश दिला होता 

३. (२०१७) लेखक व पत्रकार अरूण साधू यांचे निधन 

हे मराठी भाषेतील लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक होते. त्यांनी रशियातील तसेच भारतातील सामाजिक व्यवस्थांवर विवेचक लेखन केले आहे. ऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या प्रसिद्ध साहित्यकृती फिडेल चे आणि क्रांती, झिपऱ्या, मुंबई दिनांक, सिंहासन या आहेत

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर