दिनविशेष २२ सप्टेंबर
दिनविशेष
दि. २२ सप्टेंबर
■ दिनविशेष
* जागतिक गुलाब दिन
* World Rose Day
जागतिक गुलाब दिन दरवर्षी २२ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस मेलिंडा रोझच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. फक्त १२ वर्षांची असताना तिला अस्किन ट्यूमर नावाच्या रक्त कर्करोगाच्या दुर्मिळ स्वरूपाचे निदान झाले होते. या टर्मिनल आजाराविरुद्धच्या लढ्यादरम्यान तिने कर्करोगाच्या रुग्णांना पत्रे, कविता आणि ईमेल्स लिहिल्या. जागतिक गुलाब दिन हा रुग्ण आणि कुटुंबियांना प्रेम, आनंद आणि आशा पसरवण्याचा प्रयत्न आहे
◆ जन्म
१. (१८८७) रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म
ते महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ होते. सामूहिक शिक्षणाचे पुरस्कर्ते असलेल्या भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कमवा आणि शिका या तत्त्वज्ञानाची सुरुवात करून त्यांनी मागास जाती आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सदस्य होते
रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ज्ञानाचा दिवा बहुजनांच्या घराघरात नेण्याचे बहुमोल कार्य केले. शिक्षणासोबत त्यांनी शारीरिक श्रमाची प्रतिष्ठा प्रस्थापित केली. विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका हा मूलमंत्र कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दिला
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसारासाठी दिले. महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी शिक्षणयात्री म्हणून ते ओळखले जातात. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना कर्मवीर (कृतींचा राजा) ही उपाधी देऊन सन्मानित केले. भारत सरकारने १९५९ मध्ये पद्मभूषण हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन आणि १९८८ मध्ये त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रकाशित करून भाऊराव पाटील यांचा सन्मान केला
२. (१९१५) सांगत्ये ऐका, या चित्रपटाने भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतही इतिहास घडवणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनंत माने यांचा जन्म
तमाशाप्रधान चित्रपटांचा सुवर्णकाळ म्हणजे पन्नास,साठ आणि सत्तरचे दशक असून या कालावधी मध्ये दिग्दर्शक अनंत माने व संगीतकार वसंत पवार अनेक सुंदर सुंदर चित्रपट रसिकांसमोर सादर केले. वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन करणारे अनंत माने हे ऐकमेव दिग्दर्शक आहेत
दिग्दर्शक अनंत माने यांनीच निर्मित केलेल्या 'सांगत्ये ऐका' या चित्रपटाने भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतही इतिहास घडवला होता, नवीन विक्रम प्रस्थापित केले होते. त्या चित्रपटाला 'चित्रपटसृष्टीच्या इतिहासातलं मानाचं पान' असे मानतात
तमाशापट काढणारे अनंत माने असा शिक्का त्यांना बसला. त्यांनी उत्कृष्ट तमाशापट तर दिलेच पण मराठमोळा तमाशा रजतपटावर आणून त्यांनी या अस्सल मराठी मनोरंजनाला एक दर्जा प्राप्त करून दिला
३. (१९२३) भारतीय स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती रामकृष्ण जमनालाल बजाज यांचा जन्म
● निधन
४. (१९९१) मराठी आणि हिंदी चित्रपटातील अभिनेत्री दुर्गा खोटे यांचे निधन
इ.स. १९३२ सालच्या अयोध्येचा राजा या मराठीतील पहिल्या बोलपटात प्रमुख भूमिकांपैकी राणी तारामतीची भूमिका यांनी केली होती. भरत मिलाप (इ.स. १९४२) चित्रपटात कैकेयी, तर मुघल-ए-आझम (इ.स. १९६०) चित्रपटात जोधाबाई, इत्यादी यांनी रंगवलेल्या भूमिकादेखील विशेष गाजल्या. सुमारे पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी मराठी व हिंदी भाषांतील अनेक चित्रपट व नाटकांतून भूमिका केल्या. इ.स. १९६८ साली पद्मश्री पुरस्कार, तर इ.स. १९८३ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन यांना गौरवण्यात आले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment