दिनविशेष २० सप्टेंबर

दिनविशेष 

दि. २० सप्टेंबर

◆ जन्म 

१. (१८९७) पत्रकार डॉ. नारायण भिकाजी परूळेकर तथा न. भि. परूळेकर यांचा जन्म 

डॉ. नारायण भिकाजी परुळेकर, ऊर्फ नानासाहेब परुळेकर हे 'सकाळ'चे संस्थापक-संपादक होते. वृत्तपत्राचे स्वरूप अधिकाधिक खुले करून लोकांना त्यात सामावून घेतले पाहिजे, अशी त्यांची सकाळ सुरू करण्यामागील भूमिका होती. त्यांनी आधुनिक पत्रकारितेचा पाया घातला. पत्रकारितेतील कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरविले होते. 'निरोप घेता' नावाचे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे

● निधन

१. (१९३३) विख्यात थिओसॉफिस्ट, भारतीय राजकारण, धर्म, शिक्षणाच्या अभ्यासिका आणि समाजसुधारक ॲनी बेझंट यांचे निधन

त्या इंग्लंडमध्ये जन्मलेल्या भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि तत्त्वज्ञानी होत्या. लेखिका आणि व्याख्यात्या म्हणून विख्यात होत्या. त्या स्त्री-सुधारणावादी होत्या. अ‍ॅनी बेझंट यांचे जीवन भारतीय अध्यात्मामुळे फुलले. 'थिऑसॉफिकल सोसायटी' ही त्यांची संघटना. भारतीय तत्त्वज्ञान, संस्कृती व अध्यात्म यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्या सहभागी झाल्या. १९१७ च्या कलकत्त्याच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते

२. (१९९६) कवी, कथाकार, समीक्षक, विचारवंत, मराठी दलित साहित्यातील अग्रणी साहित्यिक, 'बलतुं'कार दगडू मारूती पवार तथा दया पवार यांचे निधन

पवार यांचे खरे नाव दगडू मारुती पवार आहे. जागल्या या टोपणनावानेही त्यांनी लेखन केलेले आहे. पवार यांच्या ’बलुतं’ या आत्मकथानत्मक पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन या युरोपियन भाषांत भाषांतरे झाली आहेत. बलुतं हे मराठीतले दलित लेखकाने लिहलेले पहिले प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाने मराठीत दलित साहित्याची पाऊलवाट निर्माण केली

३. (२०१४) लेखक, समीक्षक डॉ. अशोक रामचंद्र केळकर यांचे निधन

ते एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक होते. मराठी अभ्यास परिषदेचे ते सुमारे ७ वर्षे अध्यक्ष, आणि त्यांचे मुखपत्र ’भाषा आणि जीवन’चे प्रमुख संपादक होते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर