दिनविशेष १६ सप्टेंबर

दिनविशेष

दि. १६ सप्टेंबर 

■ दिनविशेष

१. जागतिक ओझोन दिन

ओझोनच्या थराची गरज काय आहे, हे लोकांना कळावे, त्याबद्दल जागरुकता निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी १६ सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिन (World Ozone Day) साजरा केला जातो. ओझोनचा थर सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपले रक्षण करतो

पर्यावरणाचे (environment) रक्षण करणे व त्याची योग्य प्रकारे निगा राखणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही ओझोनच्या थराबद्दल (Ozone Layer) बरंच काही ऐकलं असेल. ओझोनचा थर प्रदुषणामुळे कमी होत आहे. त्यामुळे पृथ्वीवरील तापमान वाढत (४५ अंश सेल्स) आहे. सर्वांनी पर्यावरणाची काळजी घेणे आवश्यक आहे तर तापमानाचे संतुलन राखणे शक्य होईल

◆ जन्म 

१.(१९१३) रूचिरा या पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई ओगले यांचा जन्म

या मराठीतील पाककृतिसंग्रहांच्या लेखिका, संपादिका होत्या. त्यांनी संकलित केलेल्या पाककृत्यांचा 'रुचिरा' हा संग्रह भरपूर लोकप्रिय झाला

२. (१९१६) महाराष्ट्रातील थोर सामाजिक कार्यकर्त्या, गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसेनानी कमलाबाई भागवत यांचा जन्म

महाराष्ट्राच्या चळवळीत कमलाबाईंनी सहभाग घेतला होता. त्यावेळी अनेक प्रमुख नेते तुरुंगात असताना त्यांनी नेटाने चळवळ पुढे चालवली. मार्क्सवादावरील अनेक पुस्तके मराठीत आणण्यामागे त्यांचा हातभार मोठा आहे. त्यांनी 'प्रागतिक पुस्तक प्रकाशन' संस्थेची स्थापना केली. या संस्थेने मार्क्सवादावरील बरीच पुस्तके प्रकाशित केली. समाजवाद म्हणजे आहे तरी काय, महागाई कमी करता येईल, ऐतिहासिक भौतिकवाद, स्त्री चळवळीची वाटचाल, न संपलेली वाट आदी पुस्तके त्यांनी लिहिली

३. (१९१६) विख्यात शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बालक्ष्मी यांचा जन्म 

या मॅगसेसे पुरस्कार व भारतरत्‍न पुरस्कार विजेत्या कर्नाटक शैलीतील गायिका होत्या

४. (१९४२) निसर्ग कवी आणि प्रयोगशील शेतकरी ना. धो. महानोर यांचा जन्म 

हे एक मराठी कवी आणि गीतकार होते. १९७८ तसेच १९९० मध्ये त्यांची महाराष्ट्र विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. विशेषतः त्यांच्या निसर्गकवितांसाठी ते प्रसिद्ध होते. महानोर हे रानकवी म्हणून देखील ओळखले जातात. मराठी चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली अनेक गाणी गाजली. एक होता विदुषक, जैत रे जैत, दोघी, मुक्ता, सर्जा सारख्या प्रसिद्ध चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले होते

● निधन

१. (१९९४) साहित्यक, नाटककार आणि पत्रकार जयवंत दळवी यांचे निधन

ते मराठी लेखक, नाटककार, पत्रकार होते. ठणठणपाळ या टोपणनावाने त्यांनी काही वृत्तपत्रीय स्तंभलेखन केले

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर