दिनविशेष १० ऑगस्ट

दिनविशेष 

दि. १० ऑगस्ट

■ दिनविशेष 

१. जागतिक जैव इंधन दिन

जैविक इंधनाचे महत्त्व आणि जैवइंधन क्षेत्रात भारत सरकारचे विविध प्रयत्न याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १० ऑगस्ट हा दिवस 'जागतिक जैव इंधन दिन' म्हणून साजरा केला जातो

जैव इंधन म्हणजे अपारंपारिकरित्या मिळवलेले इंधन.जैवइंधन हा जवळपास इको फ्रेंडली किंवा ज्या पासून निसर्गाला कमी हानी होईल असा इंधन प्रकार आहे. जैव इंधनचे गुणधर्म हे पेट्रोलियम डीझेलसारखे असतात. मात्र यात गंधकाचे प्रमाण नगण्य असते

◆ जन्म 

१. (१८६०) हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पं. विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्म

त्यांनी हिंदुस्तानी संगीतातील विस्कळीत वैविध्याला पद्धतशीर सैद्धांतिक चौकटीत बसवण्याकरता प्रयत्न केले. त्यातूनच त्यांनी राग, रागिण्या आणि पुत्ररागांमध्ये वर्गीकरण करण्याच्या जुन्या पद्धतीऐवजी 'थाट पद्धत' नावाची नवी वर्गीकरण पद्धत हिंदुस्तानी संगीतामध्ये आणली

२. (१८९४) भारताचे चौथे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांचा जन्म 

३. (१९२४) हिंदी विनोदी लेखक आणि वक्ते हरिशंकर परसाई यांचा जन्म

त्यांनी जबलपुरात वसुधा नावाचे साहित्यप्रधान मासिक काढले. याशिवाय त्यांचे 'नई दुनिया'मधून 'सुनो भइ साधो','नयी कहानियाँ'मधून 'पाँचवाँ कालम' और 'उलझी–उलझी' आणि 'कल्पना'मधून 'और अन्त में' आदी सदरे, ललित लेख, कादंबऱ्या इत्यादी प्रसिद्ध होऊ लागले त्यांमधूनच हरिशंकर परसाई विनोदी लेखक म्हणून ख्यातनाम झाले

● मृत्यू

१. (१९८६) लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचे निधन

१९६५ आणि १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य गाजवल्याबद्दल त्यांना ’महावीरचक्र’ मिळाले होते. त्यांच्या काळातच पंजाबात ’ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ची कारवाई झाली होती

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर