दिनविशेष ०९ ऑगस्ट
दिनविशेष
दि. ०९ ऑगस्ट
■ दिनविशेष
१. (१९४२) ऑगस्ट क्रांती दिन
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (आताचे ऑगस्ट क्रांती मैदान) झालेल्या अधिवेशनात ’चले जाव’ चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी ’करेंगे या मरेंगे’ हा संदेश दिला
२. जागतिक आदिवासी दिन
संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांचे हक्क, अधिकाराचे रक्षण व्हावे यासाठी १९९४ वर्ष हे जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले होते. १९९४ पासून ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्र संघाने केली
आदिवासींना आपले अस्तित्व, संस्कृती आणि सन्मान वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. या जमातीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी, त्यांची संस्कृती आणि आदर जतन करण्यासाठी आदिवासी दिन साजरा केला जातो
◆ जन्म
१. (१८९०) अभिनेते, गायक, संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा जन्म
ते मराठी नाट्यसृष्टीतील एक श्रेष्ठ गायक-अभिनेते होते
● मृत्यू
१. (१९०१) मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांचे निधन
ते मराठी नाट्यपरंपरेचे जनक मानले जातात. त्यांचा उल्लेख महाराष्ट्र नाट्य कलेचे भरतमुनी म्हणून केला जातो
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment