दिनविशेष ०७ ऑगस्ट
दिनविशेष
दि. ०७ ऑगस्ट
■ दिनविशेष
१. राष्ट्रीय हातमाग दिवस (National Handloom Day)
स्वातंत्र्य चळवळीत स्वदेशी वस्तू वापराचा नारा देण्यात आला. या स्वदेशीच्या ठिणगीने देशातल्या हातमाग उद्योगाला नव्याने चालना मिळाली. विदेशी वस्तूंची होळी करुन ७ ऑगस्ट १९०५ रोजी ‘स्वदेशी’चा नारा देण्यात आला. याच स्वदेशी आंदोलनाची आठवण म्हणून आणि या क्षेत्रात काम करणाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ०७ ऑगस्ट 'राष्ट्रीय हातमाग दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो
◆ जन्म
१. (१९२५) भारतीय हरित क्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्म
भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी कृषि क्षेत्रातील संशोधनासाठी 'एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन'ची स्थापना केली
● मृत्यू
१. (१९४१) जगप्रसिद्ध भारतीय कवी रविंद्रनाथ टागोर यांचे निधन
त्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते होते. ते चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आणि समाजसुधारक होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी त्यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्य व संगीतात आमूलाग्र बदल घडून आला. अतिशय लोकप्रिय कविता असलेल्या गीतांजलीचे ते कवी आहेत
२. (१९७४) प्रसिध्द हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायिका अंजनीबाई मालपेकर यांचे निधन
त्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या सुप्रसिद्ध गायिका होत्या. १९५८ मध्ये संगीत नाटक अकादमी फेलोशिपने सन्मानित होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment