दिनविशेष ०६ ऑगस्ट
दिनविशेष
दि. ०६ ऑगस्ट
■ दिनविशेष
१. जागतिक हिरोशिमा दिन
हिरोशिमा येथे ६ ऑगस्ट १९४५ रोजी झालेल्या आण्विक हल्ल्याचा निषेधार्थ हा दिवस जगभरात जागतिक अण्वस्त्र विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो
◆ जन्म
१. (१९२५) मराठी लेखिका योगिनी जोगळेकर यांचा जन्म
४५ कादंबर्या, ४ कवितासंग्रह, ४ नाटके, १२ कुमार वाड्मयाची पुस्तके इ. त्यांची साहित्य संपदा आहे
२. (१९५९) भारतीय पर्यावरणवादी राजेंद्र सिंग यांचा जन्म
हे भारतीय समाजसेवक व विख्यात पर्यावरणतज्ञ आहेत. ते जलपुरुष, पाणीवालेबाबा या नावाने ओळखले जातात
● मृत्यू
१. (१९६५) संगीतकार वसंत पवार यांचे निधन
वसंत पवार हे मराठी संगीतकार होते. बहिणाबाईंच्या कविता मराठी चित्रपटांमध्ये जेंव्हा वापरल्या गेल्या तेव्हा सुरुवातीला अनेक कवितांना संगीत देण्याची संधी पवारांना मिळाली
सांगत्ये ऐका, पठ्ठे बापूराव, बाळा जो जो रे, चिमणी पाखरे, अवघाची संसार, मानिनी, वैजयंता, पसंत आहे मुलगी, धाकटी जाऊ, सवाल माझा ऐका, मल्हारी मार्तंड इ. व अनेक चित्रपट त्यांनी संगीतबद्ध केले
२. (२०२०) पुण्यनगरी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक मुरलीधर बाबा शिंगोटे यांचे निधन
शेतकरी, वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समुहाचे मालक हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी ही शिंगोटे बाबांची खासियत होती
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment