दिनविशेष ३१ ऑगस्ट
दिनविशेष
दि. ३१ ऑगस्ट
◆ जन्म
१. (१९०७) फिलीपाइन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांचा जन्म
आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन तर्फे दरवर्षी देण्यात येतो. फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने १९५७ पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला. सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणार्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं
२. (१९४०) ख्यातनाम कादंबरीकार, लेखक साहित्यिक शिवाजी सावंत यांचा जन्म
मृत्युंजय, छावा आणि युगंधर ह्या त्यांच्या कादंबऱ्या
● निधन
३. (१९७३) शिक्षणतज्ज्ञ व बालक मंदिराच्या निर्मात्या ताराबाई मोडक यांचे निधन
४. (२०२०) भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment