दिनविशेष ०४ ऑगस्ट
दिनविशेष
दि. ०४ ऑगस्ट
◆ जन्म
१. (१८९४) आपली शैली, रेखीवपणा व तंत्र या त्रिगुणांनी मराठी साहित्याला संपन्न करणारे साहित्यिक ना. सी. फडके यांचा जन्म
ना. सी. फडके यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत
२. (१९२९) जगभरातील संगीत रसिकांना आपल्या स्वरांनी मोहिनी घालणारे गायक, अभिनेते किशोर कुमार यांचा जन्म
किशोर कुमार हे भारतीय पार्श्वगायक, गायक, अभिनेते, गीतकार, संगीतकार, निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक होते. हिंदी व्यतिरिक्त, त्यांनी बंगाली, मराठी, आसामी, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्याळम, आणि उर्दू यासह अनेक भारतीय भाषांमध्ये गायन केले आहे
३. (१९६१) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा जन्म
बराक ओबामा हे अमेरिकेचे ४४ वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष होते
४. (१९६४) अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा जन्म
झपाटललेला या मराठी चित्रपटातील 'तात्या विंचू' आणि चौकट राजा व एक डाव भुताचा या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका बजावली. प्रभावळकर यांना इ.स. २००६ च्या 'लगे रहो मुन्ना भाई' चित्रपटातील महात्मा गांधी यांच्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment