दिनविशेष २४ ऑगस्ट

दिनविशेष

दि. २४ ऑगस्ट

◆ जन्म 

१. (१८८०) कवी बहिणाबाई चौधरी यांचा जन्म 

त्यांच्या कविता वऱ्हाडी - खानदेशीत रचिलेल्या आहेत.

मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । 
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।। 
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा । 
जशा वार्‍यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।। 

२. (१९०८) क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म

३. (१९७७) भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, आणि मराठी कवी नागराज मंजुळे यांचा जन्म

पिस्तुल्या या लघुपटाचे आणि फॅंड्री, सैराट, व झुंड या चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत

● मृत्यू

१. (२०१८) मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन 

'मोरुची मावशी' या नाटकातील त्यांचं स्त्री पात्र लोकप्रिय ठरलं. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत, जत्रा, घोळात घोळ, आली लहर केला कहर, माहेरची साडी, येऊ का घरात यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर