दिनविशेष ०२ ऑगस्ट
दिनविशेष
दि. ०२ ऑगस्ट
◆ जन्म
१. (१८६१) भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते, रसायनशास्त्रज्ञ प्रफुल्ल चंद्र रे यांचा जन्म
'बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स' ही भारतातील पहिली औषधनिर्मिती कंपनी त्यांनी स्थापली
२. (१८७६) भारतीय तिरंगा राष्ट्रध्वजाची प्राथमिक संकल्पना मांडणारे, राष्ट्रध्वजाचे रचनाकार पिंगाली वेंकय्या यांचा जन्म
३. (१९१०) मराठी लेखक, कवी व नाटककार, कादंबरीकार पुरूषोत्तम शिवराम तथा पु. शि. रेगे यांचा जन्म
रेगे पाश्चात्त्य काव्याच्या काही लकबी मराठीत आणण्याचा प्रयत्न करीत होते. इटालियन कवींच्या प्रेमकवितांनी व त्यातून वाहणाऱ्या उत्कट अशा मनोहर भावनांनी त्यांच्या कविमनावर भुरळ पाडली होती. म्हणून त्यांच्या कवितांमधून स्त्री शक्ती आणि तिचे स्त्री देहधारी स्वरूप हेच वेगवेगळ्या स्वप्निल रूपांमध्ये प्रकट होताना दिसते. त्यांच्या काव्यात संस्कृतप्रचुर शब्दांची मधुर पखरण असे. जीवन जगले तर साहित्य जगेल असे नसून साहित्य जगले तरच जगण्यासारखे काही उरणार आहे; अशी त्यांची श्रद्धा व धारणा होती. वर्धा येथे १९६९ साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते
४. (१९२२) भौतिकशास्त्र, टेलिफोनचे शोधाचे जनक अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांचा जन्म
यांचे सगळ्यात महत्त्वाचे संशोधन म्हणजे दूरध्वनी. दूर अंतरावर असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा आवज काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचविणारे यंत्र असावे असे वाटत असल्याने बेल यांनी दूरध्वनी यंत्राचा शोध लावला.१८८५ मध्ये ते अमेेेरिकन टेलिफोन कंपनीचे सह-संस्थापक सुद्धा होते
बेल यांनी माणसाच्या स्वरयंत्राचा आणि कानाचा अभ्यास करून पहिले दूरध्वनी यंत्र तयार केले. दि. २ जून १८७५ या दिवशी आपले सहकारी वॉटसन यांच्यासह काम करीत असतांना दुसऱ्या खोलीतील वॉटसन यांच्या हाताच्या धक्याने ट्रान्समीटर थरथरला, तो लहानसा आवाजही बेल यांना ऐकू आला. मग बेल यांनी आपल्या ट्रान्समीटरचा उपयोग करून सहकारी वॉटसन यांना आपल्या खोलीत येण्याविषयी सांगितले. बेल यांचा तो संदेश सहकारी वॉटसन यांनी ऐकून तसा प्रतिसाद दिल्यावर संदेशाची देवाणघेवाण झाल्याबद्दल दोघांची खात्रीच पटली
१८९८ ते १९०४ या काळात बेल नॅशनल जिओग्राफिक सोसायटीचे अध्यक्ष होते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment