दिनविशेष ०८ जुलै
दिनविशेष
दि. ०८ जुलै
* जागतिक ॲलर्जी प्रतिबंधक दिन
ॲलर्जी म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला वावडं असणं. एखादी वस्तू, गोष्ट, परिस्थिती बद्दल येणारी अहितकारक प्रतिक्रिया म्हणजे ॲलर्जी होय. याच ॲलर्जीबाबत जनजागृती व्हावी म्हणून आज ०८ जुलै रोजी सर्वत्र जागतिक ॲलर्जी प्रतिबंधक दिन म्हणून साजरा केला जातो
१. (१९१६) साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार गो. नी. दांडेकर उर्फ गो. नी. दा यांचा जन्म
ते एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते. तसेच गो. नी. दा. हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते
२. (१९२२) मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर यांचा जन्म
त्या मराठी राजकारणी व भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाच्या नेत्या होत्या
३. (१९८४) आनंदयात्री, गोमंतकीय कवी बाळकृष्ण भगवंत बोरकर तथा बा. भ. बोरकर यांचे निधन
ते मराठी आणि कोंकणी भाषांत कविता करणारे पद्मश्री पुरस्कार विजेते कवी होते. ते मराठी साहित्यप्रेमीही होते. बा.भ. बोरकर हे गोमंतकाचे भूषण होते
इ. स. १९३४ साली त्यांना बडोद्यातील वाङ्मय परिषदेच्या अधिवेशनात 'तेथे कर माझे जुळती' या काव्यगायनाने कवी म्हणून त्यांना ख्याती प्राप्त झाली
बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत. निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न आहे. 'फुलत्या लाख कळ्या', 'सरीवर सरी आल्या गं' या त्यांच्या प्रेमकविता आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.
काव्यलेखनाबरोबर बोरकरांनी ललित लेख, कादंबरी, कथा, चरित्रात्मक प्रबंध यावरही लेखन केले. स्टीफन झ्वाईगच्या कादंबऱ्याचे तसेच महात्मा गांधीजींच्या काही पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले आहेत. त्यांच्या सासाय या संग्रहाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले
मराठी साहित्य विश्वात आनंदयात्री कवी अशी बोरकरांची ओळख होती. बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात. निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न आहे
प्रतिभा हा बोरकरांचा पहिला काव्यसंग्रह, त्यानंतर जीवन संगीत, दूधसागर, आनंद भैरवी, चित्रवीणा, चैत्रपुनव आणि कांचनसंध्या हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment