दिनविशेष ३१ जुलै
दिनविशेष
दि. ३१ जुलै
◆ जन्म
१. (१८८०) 'गोदान'कार, हिंदी साहित्यिक, उपन्यास सम्राट मुन्शी प्रेमचंद यांचा जन्म
ते हिंदी व उर्दू साहित्यातील नावाजलेले लेखक होते. त्यांना उपन्यास सम्राट म्हणून गौरविले जाते. प्रेमचंद यांनी इ.स. १९१३ ते इ.स. १९३१ पर्यंत एकूण २२४ कथा, १०० लेख आणि १८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या अनेक कथांमध्ये निम्न व मध्यम वर्गांचे चित्रण आहे. त्यांची 'गोदान' ही कादंबरी फार प्रसिद्ध आहे
२. (१९०२) व्यंगचित्रकार व लेखक, भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक, पद्मविभूषण केशवा तथा के. शंकर पिल्ले यांचा जन्म
त्यांना भारतातील राजकीय व्यंगचित्राचे जनक मानले जाते. १९४८ मध्ये त्यांनी शंकर्स वीकली ह्या साप्ताहिकाची स्थापना केली. शंकर्स वीकलीने अबू अब्राहम, रंगा आणि कुट्टी सारखे व्यंगचित्रकार देखील तयार केले
३. (१९०७) प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा जन्म
दामोदर धर्मानंद कोसंबी हे मराठी गणितज्ञ व इतिहास संशोधक होते. त्यांनी साम्यवादी दृष्टिकोनातून भारताचा आर्थिक इतिहास उजेडात आणला
दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी आपल्या 'ॲन इंट्राॅडक्शन टु द स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री' या ग्रंथात भारताच्या इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, घटनांचे विश्लेषण, मार्क्सवादी दृष्टी, ऐतिहासिक साधने व संशोधन या बाबींची चिकित्सा केली आहे. इतिहास म्हणजे साधन व उत्पादन यांच्या परस्परसंबंधातील एक कालानुक्रमावर आधारित घटना आहे असा त्यांचा ऐतिहासिक दृष्टिकोन होता
४. (१९४७) इ. स. १९६०-७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांचा जन्म
१९६०-७० च्या दशकांदरम्यान अनेक चित्रपटांमध्ये भूमिका करणाऱ्या मुमताज यांना १९७० सालच्या 'खिलौना' ह्या चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला
● निधन
१. (१८६५) दानशूर व शिक्षणतज्ञ, आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ ऊर्फ ’नाना’ शंकरशेठ मुरकुटे यांचे निधन
हे मराठी शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती होते. मुंबई शहराच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा होता
२. (१९४०) भारतीय क्रांतिकारक उधम सिंग यांचे निधन
जालियनवाला हत्याकांडामुळे उधमसिंग स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले. सुरुवातीच्या काळात ते अमेरिकेतील भारतीयांनी सुरू केलेल्या गदर चळवळीत सहभागी झाले
३. (१९८०) हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचे निधन
लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक होते. त्यांना भारतीय उपखंडातील महान आणि प्रभावी गायकांपैकी एक मानले जाते. त्यांच्या गाण्यांमध्ये वेगवान पेपी ते देशभक्तीपर गीते, दर्द असणारी गाणी, अत्यंत रोमँटिक गाणी, कव्वाली ते गझल आणि भजनांमध्ये शास्त्रीय गाणी अशी विविधता होती. एखाद्या अभिनेत्याच्या व्यक्तिरेखेवर आणि शैलीनुसार आपला आवाज काढण्याच्या क्षमतेसाठी, चित्रपटात स्क्रीनवर गाण्याचे लिप-सिंक करून दाखवणासाठी ते प्रसिद्ध होते
४. (२०२०) माजी केंद्रीय गृहसचिव व महाराष्ट्रचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांचे निधन
खलिस्तानी चळवळीमुळे अशांत झालेले पंजाब शांत करून त्यांनी मोलाचे योगदान दिले. कुशल प्रशासक म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा देशपातळीवर उमटवला
मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत व्यापक बदल करण्याकरिता नेमण्यात आलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. प्रधान समितीच्या अहवालानंतरच मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल करून अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि उपकरणे खरेदी करण्यात आली
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment