दिनविशेष ०३ जुलै

दिनविशेष

दि. ०३ जुलै

१. (१९०९) कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, सर्वोच्‍च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ बॅरिस्टर व्ही. एम. तथा भाऊसाहेब तारकुंडे यांचा जन्म

ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले कार्यकर्ते व मराठी कायदेतज्ज्ञ होते. १९५७ ते १९६९ या कालखंडात ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते

२. (१९२६) मराठी लेखिका, स्वातंत्र्यसैनिका सुनीता देशपांडे यांचा जन्म

त्या मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या त्या पत्नी होत्या. वंदेमातरम्' या राम गबाले दिग्दर्शित चित्रपटातील त्यांची भूमिका अतिशय गाजली होती. 'राजमाता जिजाबाई' हा एकपात्री प्रयोगही त्यांनी रंगवला होता. पुलंच्या 'सुदर मी होणार' मधील दिदीराजे ही मध्यवर्ती भूमिका सुनिताबाईंनी साकारली होती. 'आहे मनोहर तरी' हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे

३. (१९७१) विकीलीक्स चे संस्थापक ज्युलियन असांज यांचा जन्म

ते एक ऑस्ट्रेलियन पत्रकार, संपादक आहेत. असांज हे विकिलीक्स ह्या गुप्त कागदपत्रे इंटरनेटवर प्रकाशित करणाऱ्या संकेतस्थळाचे मुख्य संपादक व प्रवक्ते आहेत. आजवर असांज यांच्या नेतृत्वाखाली विकिलीक्सने लाखो गुप्त सरकारी अहवाल, मेमो व संवेदनशील कागदपत्रे खुली केली आहेत. ह्यांमध्ये अमेरिकेच्या इराक व अफगाणिस्तान यांमधील युद्धांबाबत अनेक दस्तावेजांचा समावेश आहे. २८ नोव्हेंबर २०१० रोजी विकिलीक्सने अमेरिकेच्या परराष्ट्रीय खात्याने व जगभरातील अमेरिकन राजदूतांनी लिहिलेला अत्यंत गुप्त अहवाल प्रकाशित करण्यास सुरुवात केली. ह्यामुळे असांज यांनी अमेरिकेसोबत जगभरातील अनेक देशांचा रोष ओढवून घेतला

असांज यांनी ४ ऑक्टोबर २००६ रोजी विकिलीक्सची स्थापना केली. विकिलीक्स ही 'ना नफाना तोटा' तत्त्वावर चालणारी प्रभावी आंतराष्ट्रीय संघटना आहे. अमेरिकेचे गुप्त कागदपत्रे प्रसिद्ध करणे या कार्यामुळे ही संघटना कमी वेळांत जास्त प्रसिद्ध झाली. अमेरिकेच्या इराकमधील अमानुष कारवाईच्या चित्रफिती या संघटनेने इंटरनेटवर प्रसारित केल्या, त्यामुळे संघटनेस लोकांचा पाठिंबा मिळत राहिला. सरकारी 'गुप्त' कागदपत्रे प्रसारित केल्यामुळे असांज हे नेहमीच वेगळ्या वेगळ्या सरकारी यंत्रणेच्या नजरेत असतात


४. (१९९६) प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते राजकुमार यांचे निधन

हिंंदी चित्रपटसृष्टीत अनेक सुपरस्टार झाले पण केवळ दमदार संवादफेकीच्या शैलीवर प्रेक्षकांचे हृदय जिंकणारे डॉयलॉगचे बेताज बादशहा म्हणजेच अभिनेते राजकुमार. त्यांनी आपल्या संवाद शैलीमुळे चित्रपटसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर