दिनविशेष १९ जुलै

दिनविशेष

दि. १९ जुलै

★ महत्वपूर्ण घटना

१. (१९६९) इंदिरा गांधी यांनी देशातील १४ प्रमुख शेड्युल्ड बँकांचे राष्ट्रीयकरण केले

देशातील बँकाच्या लोकशाहीकरणाला त्यामुळे खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. देशाची अर्थव्यवस्था त्यावेळी खासकरून कृषीवर अवलंबून होती. अशावेळी कृषीवर सर्वाधिक परिणाम करणारा घटक म्हणजे बँकिंग व्यवस्था. देशातील बँकिंग व्यवस्था त्यावेळी खासगी उद्योगपतींच्या हाती होती. त्यामुळे सर्वसमान्य लोकांना कर्ज मिळत नव्हते. पीक कर्ज असो वा इतर प्रकारची कर्ज असो, शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना खासगी सावकारांकडे हात पसरण्याशिवाय कोणताही पर्याय नसायचा. खासगी सावकार सर्वसामान्यांचे शोषण करायचे. आधीच कर्जाच्या खाईत गेलेला सर्वसामान्य भारतीय आणखी खोलात जायचा

या सर्वसामान्यांचा विकासच झाला नाही तर देशाच्या विकासाची गती मंदावणार ही गोष्ट लक्षात घेऊन आणि आर्थिक धोरणाच्या गरजेनुसार बँकिंग प्रणालीचे अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेतला. १९ जुलैचा दिवस भारतीय बँकिंग व्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. याच दिवशी देशातील बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला



◆ जन्म 

१. (१८२७) १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातील आद्य क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्म

१८५७ च्या उठावात प्राण त्याग करणारे मंगल पांडे हे पहिले भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते

२. (१९३८) सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा कोल्हापूर येथे जन्म

ते भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत. डॉ. नारळीकर हे अचानक आणि अपघाताने घडलेले पण आपली नाममुद्रा कोरलेले साहित्यिक आहेत. 'नारायण विनायक जगताप' या उलट्या क्रमाने आपल्या नावाची आद्याक्षरे होणाऱ्या टोपण नावाने त्यांनी विज्ञानकथा स्पर्धेत भाग घेतला

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर