दिनविशेष १४ जुलै

दिनविशेष

दि. १४ जुलै

१. (१८५६) थोर समाजसुधारक, विचारवंत, पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ गोपाळ गणेश आगरकर यांचा टेंभू कराड येथे जन्म

आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक या वृत्तपत्राचा आधार घेतला. सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान‌-निष्ठा‌ ही त्यांची जीवनमूल्ये होती. मुलींनासुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे असा लेख त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात लिहिला


२. (१९२०) माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्म

पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी तंटयात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांमुळे मराठवाडयाचा विकास झाला. जायकवाडी धरण हे शंकररावजी यांच्याच प्रयत्नांचे मोठे फळ आहे

३. (२००३) मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील चरित्र अभिनेत्री लीला चिटणीस यांचे निधन

लीला चिटणीस ह्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधून काम केले तसेच त्यांनी 'आज कि बात' ह्या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले. त्यांची 'माँ ' ह्या चित्रपटातील भूमिका अविस्मरणीय ठरली. त्यांचे त्यांच्या पतींबरोबरचे समाजकार्यातील योगदानही मोठे आहे.

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर