दिनविशेष ०२ जुलै

दिनविशेष

दि. ०२ जुलै

१. (१७७८) फ्रेंच विचारवंत, राजकीय तत्वज्ञ, लेखक आणि संगीतकार रुसो यांचे निधन

ते एक फ्रेंच लेखक, संगीतकार व तत्त्वज्ञ होते. १८ व्या शतकामधील एक आघाडीचे राजकीय तत्त्वज्ञ असलेल्या रूसोंच्या विचारांचा फ्रेंच क्रांतीवर प्रभाव पडला होता. रूसोंनी लोकशाहीची स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्त्वे घोषित केली होती. हालाखीच्या काळातही रुसोंनी कमी वयात जगभर प्रवास केला. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभवातून त्यांना शिक्षण मिळाले. लोकांना आकर्षित करण्याची नैसर्गिक क्षमता त्यांच्याकडे होती

२. (१९५०) समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली यांचे निधन

ते भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते. मेहरअली फार कमी वयात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. तरुण वयात ते ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरी विरोधात रस्त्यावर उतरले. कॉलेजमध्ये असताना ते बॉम्बे प्रेसीडेंसी युथ लिग संघटनेत सामील झाले. ते सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्यापैकी एक होते. त्यांनी १९४२ च्या चले जाव आंदोलनात महत्त्वाची भूमिका राबवली होती. 'चले जाव' ही घोषणादेखील त्यांनीच दिली होती

१९४२ मध्ये महात्मा गांधी इंग्रज सरकार विरोधात एका मोठ्या आंदोलनाच्या तयारीत होते. तत्पूर्वी त्यांनी यासंदर्भात सल्लामसलत करण्यासाठी अनेक मोठ्या नेत्यांशी चर्चा केली. यात मेहरअली देखील होते. आंदोलनासाठी रणनीती आखण्यात येत होती त्याला साजेसं म्हणून 'क्विट इंडिया' ही घोषणा द्यावी असे यूसूफ मेहरअलींनी गांधींना सुचवले. गांधींनाही कल्पना प्रचंड आवडली

सायमन कमिशन विरोधात यूसुफ मेहरअली आणि त्यांच्या तरुण क्रांतिकारकांनी दिलेला नारा इतका बुलंद होता की, त्याचा आवाज भारताच्या कोनाकोपऱ्यात पोहचला. या घटनेने यूसुफ मेहरअलींचे नाव देशभरात पोहोचले. महात्मा गांधींसोबत अनेकांच्या तोंडी 'सायमन गो बॅक'ची घोषणा आली. पनवेल येथील तारा येथे त्यांच्या नावे युसूफ मेहेर अली सेंटर चालवले जाते


#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर