दिनविशेष १० जून

दिनविशेष

दि. १० जून

* जागतिक नेत्रदान दिन

जगातील विविध देशांमध्ये नेत्रदानाचे महत्त्व ओळखून दरवर्षी १० जून हा दिवस 'जागतिक नेत्रदान दिन' म्हणून साजरा केला जातो. याद्वारे लोकांनी नेत्रदान का करावे याविषयी जनजागृती केली जाते. जागतिक दृष्टी दिनाचे नेमके उद्दिष्ट काय आहे ? नेत्रदानाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करणे आणि मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची शपथ घेण्यासाठी लोकांना प्रेरित करणे हा जागतिक दृष्टी दिनाचा मुख्य उद्देश आहे. अंधत्व ही विकसनशील देशांमधील सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर, कॉर्नियाचे रोग (डोळ्याचा पुढचा थर असलेल्या कॉर्नियाचे नुकसान) दृष्टी कमी होणे आणि अंधत्व येण्याचे एक प्रमुख कारण आहे

१. (१८९०) रविवार साप्ताहिक सुट्टी सुरूवात

भारतात ब्रिटिश राजवटीत मिल व इतर कामगार आठवड्याच्या सातही दिवस काम करत असत. त्यांना कोणतीही सुट्टी नव्हती. रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे हे एक भारतीय कामगार पुढारी होते. त्यांनी ब्रिटिशांसमोर सहा दिवस काम केल्यानंतर एक दिवस सार्वजनिक सुट्टी चा प्रस्ताव सन १८८३ साली ठेवला. अर्थातच ब्रिटिशांनी त्यांच्या मागण्या धुडकावून लावल्या. पण त्यांनी संघर्ष चालूच ठेवला आणि शेवटी सात वर्षांच्या संघर्षानंतर १० जून १८९० ला ब्रिटिश सरकारतर्फे गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑकलंड यांनी भारतात रविवारचा दिवस सुट्टीचा असं घोषित केलं 


२. (१९३८) भारतीय उद्योगपती राहुल बजाज यांचा जन्म

ते भारतामधील एक उद्योजक, बजाज ऑटो कंपनीचे संचालक होते. राहुल बजाज यांचे आजोबा जमनालाल बजाज हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते. राहुल यांच्या आजोबांना महात्मा गांधी आपला पाचवा पुत्र मानत असत. जमनालाल बजाज हे जवाहरलाल नेहरू यांचेही खूप जवळचे मित्र होते. काँग्रेस पक्षाच्या उभारणीत व राष्ट्रीय चळवळीत त्यांचे योगदान महत्वाचे होते

३. (१९९९) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना

शरद पवार यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली

४. (२०१९) कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांचे निधन

ते कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार होते. गिरीश कर्नाड हे १९७६-७८ मध्ये कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते आणि १९८८-९३ मध्ये नाटक अकादमीचे सभापती होते. त्यांना त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेटने आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने डी.लिट. या पदवीने सन्मानित केले आहे

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर