दिनविशेष ०९ जून

दिनविशेष

दि. ०९ जून

१. (१९००) आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचे निधन

बिरसा मुंडा यांची शेतीविषयक प्रश्न आणि वनविषयक बाबींमध्ये अंतर्दृष्टी होती. त्याद्वारे त्यांनी आदिवासींच्या हक्कासाठी आंदोलन छेडले

२. (१९१२) प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई यांचा जन्म

ते मराठी तसेच अन्य भारतीय भाषांतील, चित्रपटांतील गीतांस संगीत देणारे संगीतकार होते. त्यांनी गीतांना दिलेल्या चालींमुळे त्यांचे नाव भारतात आणि परदेशात प्रसिद्ध झाले होते

इ.स. १९४३ मध्ये वसंत देसाई यांनी राजकमल कलामंदिराच्या 'शकुंतला' या पहिल्या चित्रपटाला स्वतंत्रपणे संगीत दिले. त्यांची ही संगीत कारकीर्द पुढे तीस वर्षे चालूच राहिली. जवळजवळ ६५ हिंदी-मराठी चित्रपटांचे ते संगीत दिग्दर्शक होते. चित्रपट-नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले. त्यांच्या ’ए मालिक तेरे बंदे हम’ या गीताला पाकिस्तानात राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला. १९६२ च्या चीन युद्धाच्या वेळचे 'जिंकू किंवा मरू’ या ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला त्यांनीच चाल लावली होती


#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर