दिनविशेष ०७ जून
दिनविशेष
दि. ०७ जून
* जागतिक अन्न सुरक्षा दिन
दरवर्षी ७ जून रोजी 'जागतिक अन्न सुरक्षा दिन' म्हणजेच (World Food Safety Day) जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना अन्न सुरक्षेबाबत जागरूक करणे हा आहे. खराब झालेले आणि दूषित अन्न खाल्ल्याने दरवर्षी हजारो लोक आजारी पडतात. परिणामी गंभीर आजारांना बळी पडतात. याशिवाय प्रत्येक व्यक्तीला पुरेशा प्रमाणात सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे हा देखील अन्न सुरक्षेचा उद्देश आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) दरवर्षी हा दिवस अन्न-जनित आजारांना प्रतिबंधित करणे, शोधणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे या उद्देशाने हा दिवस साजरा करते
* जागतिक पोहे दिन
७ जून हा दिवस ‘जागतिक पोहे दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीतील लोकप्रिय नाष्टा म्हणजे पोहे. पोहे, कांदा, कोथिंबीर, ओले खोबरे, शेंगदाणा, शेव, टोमॅटो, फोडणीचा थाट कडीपत्ता घालून मिरचीच्या तडक्यासह लिंबू अथवा दह्यासोबत घालून तयार करतात ते गरमागरम खमंग पोहे
१. (१९१३) लेखक टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचा जन्म
ते मराठी भाषेतील समीक्षक व ललितलेखक होते. अंतर्मुखता हे नव्या काव्याचे प्रमुख लक्षण असल्याचे सांगून काव्यातील ऐहिकता, निसर्गप्रेम आणि गूढवादाचा उलगडा त्यांनी आपल्या लेखनातून केला
२. (२०००) बालसाहित्यिक गोपीनाथ तळवलकर यांचे निधन
ते मुलांच्या 'आनंद' मासिकाचे संपादक व एक ख्यातनाम बालसाहित्यिक होते. गोपीनाथ तळवलकर हे ३५ वर्षे या मासिकाचे संपादक होते. प्रौढ साक्षरांसाठीही त्यांनी लिखाण केले. कणिका, खंडकाव्य, बालकविता असे विविध काव्यप्रकार त्यांनी हाताळले. आकाशमंदिर, छायाप्रकाश, नंदिता या कादंबऱ्या, ज्ञानेश्वरीतील सौंदर्यविश्व हे रसग्रहण, तसेच मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती. त्यांचे काही लिखाण ’गोपीनाथ’ या टोपणनावाने केलेले आहे
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment