दिनविशेष ०४ जून
दिनविशेष
दि. ०४ जून
१. (१९३६) चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म
त्या प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या एक भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या. मिस इंडिया बनणाऱ्या पहिल्या अभिनेत्री नूतन बहल होत
२. (१९४६) पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचा जन्म
ते तमिळ, तेलुगु, कानडी, मल्याळम आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक होते. गंगाई अमरन, इलया राजा, अनिरुद्ध, भास्कर या आपल्या संगीत क्षेत्रातील मित्रांसह त्यांनी एका बँडची स्थापना केली. हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता सलमान खान यांच्या आवाजाशी साम्य असल्याने त्याच्या चित्रपटातील त्याच्या गीतांना पार्श्वगायन करण्याची संधी सुब्रमण्यम यांना मिळाली. संगीत क्षेत्रात एकाच व्यक्तीने ४०,००० गीते गायल्याचा विक्रम त्यांच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये नोंदविला गेला आहे
३. (१९४७) मराठी विनोदी अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म
मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे एक मराठी सुपरस्टार आहेत
४. (१९४७) बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचे निधन
ते एक बौद्ध धर्माचे व पाली भाषेचे अभ्यासक व मराठी लेखक होते. त्यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारमध्ये (ब्रह्मदेशात) जाऊन त्यांनी ब्रह्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला
५. (२०२३) ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन
सुमारे सहा दशके सुलोचना लाटकर यांनी आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. रुपेरी पडद्यावर त्यांनी साकारलेल्या सात्त्विक, सोज्वळ अशा वात्सल्यमूर्ती आईच्या भूमिका कोट्यवधी रसिकांच्या मनात घर करून आहेत
सुमारे दीडशेहून अधिक मराठी, अडीचशेहून अधिक हिंदी चित्रपटांत दमदार अभिनयासाठी त्या कायम लक्षात राहतील. मराठी व हिंदी चित्रपटात सन्माननीय सुलोचना दीदींनी सुमारे दोनशे वेळा आईची भुमिका पडद्यावर साकारली पण प्रत्येक वेळी प्रत्येकाची वेगळी, वेगळ्या संस्कृतीतील आई त्यांनी दर्शवली पण दैनंदिन व वैयक्तिक जीवनात मात्र त्या स्वतंत्रच राहिल्या
चीनच्या आक्रमणावेळी भारतीय सेनेला घरचं सोनं-नाणं, चांदी सगळं देऊन इतरांप्रमाणे प्रसिद्धीसाठी कुठेही वाच्यता न करणारया सुलोचला दीदी फक्त अभिनेत्री म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणूनही खरोखरच महान होत्या
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment