दिनविशेष ३० जून

दिनविशेष

दि. ३० जून

* जागतिक सोशल मीडिया दिन

स्मार्टफोन आणि सोशल मीडिया हे आता आपल्या जीवनातील महत्त्वाचे घटक झाले आहेत. ३० जून हा दिवस जागतिक सोशल मीडिया दिन म्हणून साजरा केला जातो. २०१० साली या दिवसाची सुरुवात करण्यात आली. आजच्याएवढा तेव्हा सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात पसरलेला नव्हता. मात्र भविष्यातील त्याची लोकप्रियता वाढण्याची चिन्हं तेव्हाच दिसू लागली होती

खरंतर आजच्याच दिवशी सोशल मीडिया दिन साजरा करण्यामागे एक खास कारण आहे. मॅशेबल या टेक्नॉलॉजी आधारित गोष्टींची माहिती देणारी एक वेबसाईट यासाठी कारणीभूत आहे. या वेबसाईटने ३० जून २०१० रोजी जागतिक सोशल मीडिया दिन साजरा केला. पुढील वर्षी देखील हा ट्रेंड सगळीकडे सुरू राहिला. यानंतर हा दिवस जगभरात सगळीकडेच सोशल मीडिया दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला

१. (१९१७) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, दादाभाई नौरोजी यांचे निधन

ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते. दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह, भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणूनही ओळखले जाते. जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे ते नेते होते. इंग्रजांच्या मतदारसंघातून निवडून येणारे व तेथील हाउस ऑफ कॉमन्सचे सभासद बनणारे ते पहिले भारतीय होत. १८८३ साली ब्रिटिशांकडून त्यांना जस्टिस ऑफ पीस हा क़िताब देण्यात आला


२. (१९९४) नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक बाळ कोल्हटकर यांचे निधन

ते मराठीतील नाटककार, कवी, अभिनेते व नाट्यदिग्दर्शक होते. त्यांनी लिहिलेल्या दुरितांचे तिमिर जावो, वाहतो ही दुर्वांची जुडी, मुंबईची माणसे, एखाद्याचे नशीब इत्यादी नाटकांचे हजारांहून अधिक प्रयोग झाले. तीन दशकांच्या साहित्यिक कारकिर्दीत यांनी ३० हून अधिक नाटके लिहिली

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर