दिनविशेष २८ जून

दिनविशेष

दि. २८ जून

१. (१९२१) भारताचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव (इ.स. १९९१ ते इ.स. १९९६) यांचा जन्म

ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षही होते. भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान कारकिर्दीत १९९१ साली झाली

२. (१९२२) लोकप्रिय गीतकार कवी प्रा. भालचंद खांडेकर यांचा जन्म

चंद्रप्रकाश, गंधसमीर हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. प्रेमातील विविध भावछटांचे प्रकटीकरण त्यांच्या कवितांतून दिसते. परंतु दांभिकता, अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्याची प्रवृत्तीही दिसते

३. (१९३७) साहित्यिक, समीक्षक, दलित साहित्य चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श या त्रैमासिकाचे संस्थापक संपादक डॉ. गंगाधर पानतावणे यांचा जन्म

ते मराठीतील लेखक, संशोधक, समीक्षक व आंबेडकरवादी विचारवंत होते. ते पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, वैचारिक साहित्याचे एक निर्माते व अस्मितादर्श चळवळीचे जनक होते. त्यांनी अनेक कवी-लेखकांच्या पुस्तकांना विवेचक प्रस्तावना लिहिल्या आहेत


४. (१९९०) लोकप्रिय गीतकार कवी प्रा. भालचंद खांडेकर यांचे निधन

जन्मदिवशीच त्यांचे निधन झाले

५. (१९९८) पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांचे निधन

भारतातील पहिल्या विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवीधारक शास्त्रज्ञ म्हणून त्या प्रसिद्ध होत्या

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर