दिनविशेष १५ जून

दिनविशेष

दि. १५ जून

१. (१९०७) स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत नानासाहेब गोरे यांचा जन्म

स्वातंत्र्यसंग्राम आणि समाजवादी चळवळीतील त्यांचे योगदान अतुलनीय होते. माणसातल्या सद्विवेक शक्तीवर त्यांची अढळ श्रद्धा होती


२. (१९३१) अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखन शैलीचे प्रवर्तक, संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचे निधन

अच्युत वामन कोल्हटकर हे मराठी पत्रकार होते. ते 'संदेश' वृत्तपत्राचे संस्थापक-संपादक होते. १९३० मध्ये गांधींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना कारावास भोगावा लागला होता

३. (१९३३) मराठी लेखिका, समिक्षीका सरोजिनी वैद्य यांचा जन्म

ललितलेखन, चरित्रलेखन, समीक्षा या साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुखपदी, तसेच राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकपदी त्यांनी काम केले

४. (१९४७) साहित्यिक आणि नाटककार प्रेमानंद गज्वी यांचा जन्म

ते मराठी कवी, लेखक व नाटककार आहेत. त्यांची लेखनशैली ही सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणारी शैली आहे. त्यांच्या घोटभर पाणी या एकांकिकेचे १४ भाषांत अनुवाद झाले आहेत

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर