दिनविशेष ०२ जून

दिनविशेष

दि. ०२ जून 

१. (१९०७) कादंबरीकार, पटकथाकार, मराठी नाटककार आणि लेखक विष्णू विनायक बोकील यांचा जन्म

२. (१९५६) तामिळ चित्रपट निर्माते, पटकथालेखक, चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा जन्म

त्यांनी तमिळ, तेलुगू, कन्नडा, मल्याळम आणि हिंदी अशा अनेक भारतीय भाषांमधील चित्रपटांचे दिग्दर्शन केले. दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या रोजा, बॉम्बे, इरूवर, दिल से आणि कन्नाथील मुथामित्तल या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली

३. (१९८८) अभिनेते, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक राज कपूर यांचे निधन

त्यांना बॉलीवूडमधील शोमॅन म्हणून ओळखले जात असे. आजही त्यांचे चित्रपट देशविदेशातील विविध चित्रपट महोत्सवांत दाखविले जातात

४. (२००४) बहुआयामी व्यक्तिमत्त्व डॉ. श्रीकांत जिचकार यांचे निधन

देशातील सर्वाधिक पदव्या संपादन केलेले नेते म्हणून त्यांची ओळख होती. १९९० पर्यंत त्यांनी ४२ विद्यापीठांच्या परीक्षा देऊन त्यातील २८ परीक्षांमध्ये सुवर्णपदक मिळवल्यानं त्यांना ज्ञानयोगी संबोधलं जायचे. त्यांचे नाव हे भारतामधील सर्वांत जास्त शिक्षित व्यक्ती म्हणून घेतले जाते. यांच्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये ५२,००० पुस्तकांचा संग्रह होता


#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर