दिनविशेष ३० मे

दिनविशेष

दि. ३० मे

* हिंदी पत्रकारिता दिवस 

कलकत्ता शहरातून युगल किशोर शुक्ल यांनी ‘उदंड मार्तंड’ हे हिंदीतील प्रथम वृत्तपत्र ३० मे १८२६ रोजी सुरु केले होते. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून देशभर हा दिवस हिंदी पत्रकारिता दिवस म्हणून साजरा केला जातो

१. (१७७८) फ्रेंच लेखक, कवी व तत्त्वज्ञ व्हाल्टेअर यांचे निधन

ते एक फ्रेंच लेखक, कवी व तत्त्वज्ञ होते. व्हॅाल्टेअर यांनी नवलकथा, निबंध, नाटके, कविता, ऐतिहासिक, शास्त्रीय असे चौफेर लेखन केले व त्यातून त्यांनी फ्रान्समधील अनियंत्रित राजेशाही, स्वार्थी धर्मगुरू व विलासी उमराव यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. 'कॅन्डिड' हा त्यांचा विशेष प्रसिद्ध ग्रंथ आहे. त्यांनी एकूण २,००० पुस्तके तसेच २,००० पेक्षा अधिक पत्रे लिहिली. त्यांचे ललित लेखन उपरोधिक असे. लोकांच्या मनातील सुप्त भावनांना शब्दरूप करण्याचे महत्त्वाचे कार्य व्हॅाल्टेअरने यांनी केले. फ्रान्समधील विषम समाजव्यवस्थेवर त्यांनी कडक टिका केली. त्यांच्या विचारामुळे लोकजागृती होऊन, लोक जुलूम व अन्यायाच्या विरुद्ध बंड करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हणता येईल


२. (१९१६) लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार दीनानाथ दलाल यांचा जन्म

भारतीय पारंपरिक चित्रशैलीचे संस्कार त्यांच्या चित्रातून दिसत. वास्तववादी चित्रांतील त्यांचे कसब वादातीत होते. पुस्तकांतील बोधचित्रे व मुखपृष्ठाकरीता ते अधिक ओळखले जात

१९४४ मध्ये दलाल आर्ट स्टुडिओची स्थापना करून दलालांनी मराठी प्रकाशनविश्‍वात पुस्तकांची मुखपृष्ठे, अंतरंगचित्रेरं रेखाटण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच लोकांना त्यांच्या कामातील कलात्मक ताकदीचा परिचय होऊ लागला. मराठी पुस्तकांचा चेहरामोहरा बदलू लागला. कारण, आता प्रकाशनविश्‍वात ‘दलाल-पर्व’ सुरू झाले होते. नवे मराठी पुस्तक आणि दलालांनी रंगवलेले मुखपृष्ठ असे जणू समीकरणच झाले होते. त्या काळात दलाल नावाची मोहिनी मराठी रसिकांवर पडली होती

३. (१९५५) भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार तथा ना. म. जोशी यांचे निधन

ना. म. जोशी यांनी कामगारांचे नेते म्हणून कामगारांच्या कल्याणासाठी इ.स. १९११ मध्ये बॉम्बे सोशल सर्व्हिस लीग ही संघटना स्थापन केली. त्यांनी आयुष्यभर कामगारांच्या कल्याणाचेच काम केले. त्यांच्या नेतृत्वात पुढे १९२९ साली AITUC (All India Trade Union Congress) ची स्थापना झाली. त्यांच्या कार्याच्या समर्थनार्थ मुंबईतील भायखळा आणि प्रभादेवी ही ठिकाणे जोडणाऱ्या डिलाईल रोड नावाच्या महत्त्वाच्या रोडचे नाव बदलून ना. म. जोशी मार्ग करण्यात आले

४. (१९६८) चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचे निधन

ते महाराष्ट्रीय चित्रकार होते. जलरंग आणि तैलरंगातील चित्रकारीतेत त्यांची विशेष ख्याती होती. ते उत्तम कलाशिक्षक होते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर