दिनविशेष २४ मे
दिनविशेष
दि. २४ मे
१. (१९२४) आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार रघुवीर भोपळे ऊर्फ जादूगार रघुवीर यांचा जन्म
जादू ही कला आहे, हे सांगणारे ते एकमेव सत्यवादी जादूगार होते. त्यांनी इंग्लंड, जपान, रशिया इ. देशांत आपले प्रयोग सादर केले. त्यांनी ७ हजार २३ प्रयोग सादर केले. 'जादूची शाळा' नावाची एक संस्था त्यांनी पुण्यात काढली
२. (१९४२) जागतिक कीर्तीचे मराठी पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचा जन्म
राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य असताना २०१० ते २०१२ या कालावधीत माधव गाडगीळ यांनी आदिवासींचे नैसर्गिक संसाधनावरील हक्क, अन्नसुरक्षा कायदा व नक्षलग्रस्त भागाचा विकास यासाठी धोरणात्मक पातळीवर बहुमोल योगदान दिले. केंद्र शासनाने पश्चिम घाटातील पर्यावरण अभ्यासासाठी नेमलेल्या गाडगीळ समितीचा अहवाल हा एक महत्त्वाचा दस्तऐवज झाला आहे. पर्यावरणाबाबत अनेक मूलभूत चर्चा यामुळे सुरू झाल्या
लोकसंख्येचे जीवशास्त्र, सर्वसाधारण पर्यावरण, पर्यावरण-संरक्षण, पर्यावरणाची मानवी बाजू आणि ऐतिहासिक पर्यावरण हे प्रा.डॉ. माधव गाडगीळ यांचे संशोधनाचे विषय आहेत. जीवशास्त्र व पर्यावरण शास्त्रज्ञ, संशोधक, अध्यापक, शेतकरी, सामान्य जनता, पर्यावरणाशी संबंधित बिनसरकारी संस्था आणि राष्ट्रीय पर्यावरण धोरणे आखणारे सरकारी आणि संस्थाकीय अधिकारी यांच्याशी माधव गाडगीळ यांचा सततचा संपर्क असतो
माधव गाडगीळ हे सह्याद्री पर्वतभागाच्या पर्यावरणीय अहवाल समितीचे (गाडगीळ कमिशनचे) अध्यक्ष होते. भारतातल्या पहिले जैवशास्त्रीय संरक्षित वन या कल्पनेचे ते जनक आहेत. माधव गाडगीळ हे पर्यावणाच्या शालेय पातळीवरील अभ्यासक्रम निश्चित करणाऱ्या सरकारी समितीचे अध्यक्ष होते
३. (२०००) दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार आणि कवी मजरुह सुलतानपुरी यांचे निधन
ते एक भारतीय उर्दू कवी व गीतकार होते. १९५० व १९६० च्या दशकांमध्ये बॉलिवूडमधील आघाडीच्या व सर्वात लोकप्रिय गीतकारांपैकी एक असलेल्या असलेल्या मजरूह सुलतानपुरी ह्यांनी जवळजवळ सर्व प्रमुख भारतीय संगीत दिग्दर्शकांसाठी अनेक यशस्वी गाणी रचली
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment