दिनविशेष २२ मे
दिनविशेष
दि. २२ मे
* जागतिक जैवविविधता दिन
झपाट्याने नष्ट होणाऱ्या जैवविविधतेबाबत आपल्या पिढीमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी आज जागतिक जैवविविधता दिन साजरा केला जातो. आपल्या सर्वांकडून निसर्गाचा समतोल राखला जावा आणि जैवविविधते सोबत निसर्गाचा होणारा ऱ्हास टाळता यावा यासाठी समाजात जनजागृती होणे महत्वाचे आहे
१. (१७७२) समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजाराम मोहन रॉय यांचा जन्म
राजा राममोहन राॅय ह्यांनी मूर्तिपूजेला, देवदेवतांच्या पूजेला विरोध केला. जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे व तो निर्गुण, निराकार आहे, असे ते मानत. हिंदू धर्मातील कालबाह्य झालेल्या रूढी व परंपराना त्याचा विरोध होता. भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी १८२८ साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली. जुन्या प्रथा, परंपराविरुद्ध लढा दिला. भारतातील धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था, व शिक्षणव्यवस्था यासंदर्भात लेखन करण्यास सुरुवात केली. त्यासाठी काही वृतपत्रे तसेच सुधारणा चळवळ सुरू केली. त्यांनी ४ डिसेंबर १८२१ रोजी संवाद 'कौमुदी' हे बंगाली भाषेतील तर १२ एप्रिल १८२२ रोजी 'मिरात उल अखबार' हे पर्शियन वृतपत्र सुरू केले. त्यांनी १८२८ साली प्रेसिडेन्सी कॉलेज सुरू केले. राजा राममोहन रॉय यांनी लॉर्ड विलियम बेंटिक या भारताच्या गव्हर्नर जनरलच्या साहाय्याने सन १८२९ मध्ये भारतातील सतीची प्रथा कायद्याने बंद करवली
२. (१९९१) भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे निधन
कॉम्रेड डांगे यांना भारतातील कम्युनिस्ट चळवळीतील भीष्माचार्य असे म्हणतात. भारतीय कामगार चळवळीचे ते अध्वर्यू समजले जातात. त्यांनी भारतावरच्या ब्रिटिश राजवटीत आयुष्याची १३ वर्षे तुरुंगात काढली. संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. डांगे हे अप्रतिम वक्ते होते. प्रारंभी शांत आणि सौम्य आवाजात सुरू झालेली त्यांची माहितीपूर्ण भाषणे प्रसंगी आणि अंती प्रक्षोभक असत
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment