दिनविशेष २० मे

दिनविशेष

दि. २० मे

* जागतिक मधमाशी दिन

जागतिक मधमाशी दिन हा २० मे २०१८ पासून साजरा केला जातो. जागतिक मधमाशी दिनाची तारीख २० मे म्हणून निवडण्यात आली, कारण या दिवशी स्लोव्हेनियामधील मधमाशीपालन करणाऱ्या कुटुंबातील अग्रगण्य अँटोन जानसा यांचा जन्म झाला. तसेच अग्रगण्य अँटोन यांच्या कुटुंबाची मधमाश्या पालण करण्याची परंपरा होती. त्यामुळे अग्रगण्य अँटो हे देखील मधमाश्या पालण करत होते. मधमाश्याचे पाळण हे जास्त प्रमाणात स्लोवेनिया या देशात केले जाते. मधमाश्या पाळण्याच्या बाबतीत स्लोवेनिया हा आघाडीचा देश आहे. हा देश युरोपीय देशांपैकी एक आहे. मधमाश्याना सर्वाधित आकर्षक परागकण वाटतो. त्या एका फुलातून दुसऱ्या फुलावर परागकण वाहून नेतात, तसेच परागकण एका जागेवरून दुसऱ्या फुलाकडे नेल्यास कृषी उत्पादन वाढ होते. फळाच्या झाडाला जी फुले लागतात ती काही काळानंतर फळे ही मधमाश्यामुळे बनतात. तसेच फुलांच्या झाडांना कळी फुलवायची असेल तर मधमाशी तिला फुलविण्याचे काम करते. मधमाशी ही मानवाच्या जीवनात फार मोठे काम करते. तसेच शेतकरी देखील त्यांच्या पिकांचे परागीकरण करण्यासाठी मधमाशांवर अवलंबून असतात

१. (१७६६) इंदूर राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी मल्हारराव होळकर यांचे निधन

ते भरत वर्ष सम्राट छत्रपती शाहू महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या माळवा (मध्य प्रदेश) प्रांताचे पहिले सुभेदार होते. छत्रपती शाहु महाराज यांचे मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मल्हाररावांना छत्रपती शाहु महाराजांनी इंदूर संस्थानाची जहागिरी दिली 


२. (१८५०) आधुनिक मराठी गद्याचे जनक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म 

ते मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार आणि देशभक्त होते. १८७४ साली चिपळूणकरांनी निबंधमाला ह्या मासिकाचे प्रकाशन आरंभले. १८७४ सालापासून हयात असेपर्यंत, म्हणजे सुमारे आठ वर्षे, त्यांनी निबंधमाला चालवली. निबंधमालेतील निबंधांतून त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध टीकात्मक लिखाण, तसेच साहित्यिक लिखाणही लिहिले

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर